सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात बीड पाटबंधारे विभागाच्या बेलपारा मध्यम प्रकल्पातील पाणी उपसा करणाऱ्या जवळपास ४० शेतकऱ्यांच्या विजपंपांच्या चो-या झाल्या आहेत. या चो-यांच्या तक्रारी संबंधित शेतकऱ्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
वडगाव व चिचंपुर पांगुळ, ढाकणवाडी येथील सुमारे ४० शेतक-यांच्या बेलपारा मध्यम प्रकल्पातील विजपंपाची चोरी येथील जवळच्याच लोकांनी केली आहे. शेतक-यांनी पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ केल्यामुळे चोरट्यांचे जास्तच फावले आहे. सुमारे ४० विजपंपाची किंमत तब्बल १७ ते १८ लाख रुपयापर्यंत आहे. शेतक-यांचे विजपंप चोरणा-या टोळीचा तपास पोलिसांनी करून चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत तुकाराम नारायण बडे (रा.चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी)या शेतक-याने पोलिसात १० अस्वशक्तीचा विजपंप चोरी गेल्याची फिर्याद दिली आहे.सुमारे विस ते पंचवीस शेतकरी देखील यावेळी पोलिस ठाण्यात आले होते.
आशिष बडे, भगवान गरड, केशव केदार, घनश्याम पांगरे, आजिनाथ पांगरे, रामनाथ गरड, सुभाष शेळके, हुसेन शेख, प्रभाकर रामराव बडे, किरण बडे, त्रिंबक गरड, केशव केदार, पोपट बडे, आजिनाथ गरड यांच्यासह अनेक शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत.
चिचंपुर पांगुळ वडगाव व ,ढाकणवाडी या
गावातील सुमारे चाळीस विजपंप चोरीला गेलेले आहेत. परीसारतील चोरटेच हे काम करीत असल्याचे शेतक-यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांना सांगितले. चोरीची तक्रार एका शेतक-याने दिली असुन पंचवीस ते तिस शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत असे तक्रारीत म्हटले आहे.
👉बेलपारा मध्यम प्रकल्पातून सुमारे चाळीस शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत. यामुळे शेतकरी आता रडकुंडीला आले आहेत. यावेळी शेतक-यांनी काही संशयीत लोकांचे नावे पोलिस अधिका-यांना सांगितले आहेत. लवकर चोरटे जेरबंद करावेत, अशी मागणी सुमारे चाळीस शेतक-यांनी पोलिस अधिका-यांना भेटून केली आहे.