👉पाथर्डी पंचायत समिती बीडिओकडे तक्रार अर्ज
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीकडे ग्रामसभा घ्यावी, यासाठी अनेक वेळा मागणी करुनही अद्यापपर्यंत ग्रामसभा घेतली गेली नाही, याबाबत चिंचपूर पांगुळचे ज्येष्ठ नागरिक पोपट हरिभाऊ बडे पा. यांनी पाथर्डी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
चिंचपूर पांगुळ (ता. पाथर्डी) ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक ही दोघेही संगनमताने मनमानी कारभार करीत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये नवीन पदाधिकारी आल्यापासून गेली ८ ते १० महिन्यांपासून एकदाही चिंचपूर पांगुळ येथे ग्रामसभा घेण्यात आली नाही. दि.२६ जानेवारी २०२२ आणि १ मे २०२२ या महत्त्वाच्या दिवशी ग्रामसभा घेणं बंधनकारक असतानाही घेतल्या गेल्या नाहीत. कुठल्याही प्रकारची विकास कामे सुरू नाहीत.गेल्या दीड वर्षापासून कुठलेही विकास कामे केली जात नाहीत. कामाबद्दल विचारल्यावर माहिती दिली जात नाही. या सर्व बाबींची चौकशी व्हावी, अशी मागणी पाथर्डी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी द्वारे केली आहे.