संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील जि.प.प्रा.शाळा हनुमानवस्ती येथे विद्यार्थींना एक थाप कौतुकाची या उपक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला .
कु.समृद्धी दिपक बांगर (श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी), चि.ऋतुराज शरद खेडकर (जि.प.प्रा.शाळा करोडी), कु.तनुजा पोपट वाघमारे(जवाहर विद्यालय चिंचपूर इजदे), चि.श्रेयस अभिमन्यू खेडकर व चि.आदित्य निलेश पाखरे(जि.प.प्रा.शाळा हनुमान वस्ती चिंचपूर इजदे) या प्रज्ञावंतांना गौरवण्यात आले.राज्यस्तरीय किल्लाबांधणी स्पर्धेतील यशाबद्दल चि.सर्वेश सचिन शिंदे (जि.प.प्रा.शाळा हनुमान वस्ती) याचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.प्रा.शाळा चिंचपूर इजदेचे मुख्याध्यापक भास्कर दराडे सर होते. उमेश सोनवणे सरांनी प्रास्ताविक केले. रामदास दहिफळे सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी दादासाहेब पालवे सर (मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा विठ्ठलवाडी), अंबादास खंडागळे महाराज, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत खेडकर, दिपक बांगर सर, प्रा.शरद खेडकर, रविंद्र खेडकर सर, अभिमन्यू खेडकर, सोनू शिरसाट, अमोल दहिफळे, अंबादास दहिफळे, विशाल खेडकर, ऋषिकेश नन्नवरे आदी उपस्थित होते.
हनुमान वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुसूम बडे मॕडम आणि सचिन शिंदे सरांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.