संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्ताने प्रितम मेहेर मित्रमंडळ व बीमा मंडी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्रा. शाळा चिंचपूर इजदे, हनुमान वस्ती, देवळकर वस्ती,डोळे वस्तीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दि.१७ सप्टेंबर ते दि.२ आॕक्टोबर हा कालावधी देशभर सेवा पंधरवाडा म्हणून साजरा होत आहे. त्याअंतर्गत या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक अरविंद पारगावकर हे प्रमुख पाहुणे होते. युवानेते विजय मिसाळ हे अध्यक्षस्थानी होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक खेडकर, उपाध्यक्ष शिवाजी डोळे, सदस्य गोरक्ष गायकवाड, कृषी सहाय्यक अशोक मिसाळ, लक्ष्मण डमाळे, सोमनाथ राऊत, स्वप्निल खेडकर आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी आदर्श शिक्षिका गिता-खेडकर शेकडे यांनी चि.प्रसाद सुभाष शेकडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भास्कर दराडे, अंबादास सोनपुरे, अशोक सांगळे, मुख्याध्यापिका कुसूम बडे, शिक्षकवृंद मंगल खेडकर, नम्रता सातपुते, सुनिल खेडकर, संतोष खेडकर, सचिन शिंदे, कलिम शेख, राम दराडे, शाम दराडे , प्रिया नन्नवरे आदिंनी परिश्रम घेतले.
✍🏻प्रतिनिधी-सोमराज बडे
मोबा.९३७२२९५७५७