👉दोन्ही गटांत हामरीतुमरी व शाब्दिक चकमकी
(सोमराज बडे)
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : – तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील हनुमानवस्ती मार्गी जाणा-या मंजूर सिमेंट क्राॅकिटीकरण रस्त्याचे काम करण्यास सरपंच, ग्रामसेवक यांनी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केले उपोषण अखेर समझोता झाल्याने रात्री उशिराने पाथर्डी पंचायत समिती बीडीओ यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान दोन गट आमनेसामने आल्याने शाब्दिक चकमकी झाल्या.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे ग्रामपंचायतचे सदस्य श्रीकांत गणपत खेडकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवार (दि.१८) पासून चिंचपूर इजदे सरपंच, ग्रामसेवक यांच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालय चिंचपूर इजदे येथे उपोषणास बसले होते.

चिंचपूर इजदे हनुमानवस्तीवर जाण्यासाठी सिमेंट क्राॅकिटीकरणचा रस्ता हा १५ व्या वित्त आयोगातून गेल्या ९ ते १० महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली असून, त्यास प्रशासकीय मान्यता देखील मिळालेली आहे., परंतु गेल्या अनेक महिन्यापासून सरपंच,ग्रामसेवक यांना वेळोवेळी सांगून सुद्धा काम करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यासंबंधित आदेश काढून (वर्क ऑर्डर) सह्या करत नाहीत. त्यामुळे संबंधित
क्राॅकिटीकरण रस्त्याचे काम सुरु होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वस्तीवरील महिला, विद्यार्थी यांच्यासह नागरिकांना या रस्त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे सात दिवसात प्रत्यक्ष काम सुरू करावे, याबाबत ग्रामपंचायत सदस्य श्री खेडकर यांनी दि.१० जानेवारीला तहसीलदार पाथर्डी, पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक चिंचपूर इजदे, पाथर्डी पोलीस ठाणे यांना निवेदन दिले होते. यानंतरही कोणतीही कार्यवाही चिंचपूर इजदे ग्रामपंचायत प्रशासनाने केली नाही, या निषेधार्थ चिंचपूर इजदे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत खेडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ केशव खेडकर, आजीनाथ खेडकर, बाबासाहेब खेडकर, नवनाथ खेडकर, विशाल खेडकर, सुधीर पालवे,मधुकर आव्हाड, तात्या खेडकर, साहेबराव खेडकर, शाहादेव नागरगोजे, राजेंद्र डोळे, उद्धव खेडकर, अंकुश डोळे, अंबादास वारे, संजय खेडकर,नागरगोजे विठ्ठल, निवृत्ती कंठाळे आदीसह नागरिक उपोषणास बसले होते. परंतु यानंतर पाथर्डी बीडिओ डाॅ.पालवे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
दरम्यान दोन्ही गटांमध्ये हामरीतुमरी होऊन शाब्दिक चकमकी झाल्याने हे प्रकरण थेट पाथर्डी पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. या ठिकाणी दोन्ही गटांच्या समजूती काढून प्रकरण तेथे मिटविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.