सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे श्री रामगड मंदिरात संत चोखोबा मेळा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. वारकरी संप्रदायात आदराचे स्थान असलेले संत चोखामेळा यांची दरवर्षी येथे पुण्यतिथी साजरी केली जाते. दरम्यान काल रात्री भजनी मंडळ यांनी हरी जागर केला तसेच पहाटे काकडा आरती करण्यात आली. सकाळी संत चोखोबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर नैवेद्य दाखवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी नवनाथ गोसावी-भारती महाराज, सोपान ज्ञानोबा बडे, कोंडीबा खंडागळे, दिनकर राजगुरू, विठ्ठल बडे, बापूराव बडे, बाबासाहेब बडे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
