सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील पूर्वेेकडील शेवटच्या टोक असलेल्या चिंचपुर पांगुळमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपासून पहिल्यांदाच बाल आनंद बाजार भरला असून मुलांना शालेय ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञान समजावे,त्याचे प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(१ली ते ४थी) चिंचपूर पांगुळ येथे (ता.४)शनिवार रोजी बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. अहंमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता. बाल आनंद बाजाराच्या माध्यमातून मुलांमध्ये शालेय ज्ञानासोबत व्यवहार ज्ञानाचे आकलन व्हावे,नफ-तोटा समजावा हा यामागचा उद्देश असल्याचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, चहा,नास्ता तसेच सर्वप्रकारचा सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होता. गावातील ग्रामस्थ व परिसरातील लोकांनी या बाजारात हजेरी लावून मोठ्याप्रमाणात खरेदी देखील केली. सुमारे पाच हजार रुपयांपर्यंतची या बाजारात उलाढाल झाली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सापते यांनी सांगितले. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. असे मत मुख्याध्यापक संतोष रामनाथ सापते यांनी व्यक्त केले.
चिंचपूर पांगुळ गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल आनंद बाजार भरल्याने या बाजारात लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.या बाजाराचे उद्घाटन ग्रा.प.सदस्य विष्णू खाडे व पत्रकार सोमराज बडे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करुन बाल आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आनंद रधवे,सोमराज बडे,भागीनाथ बडे यांची भाषणे झाली. याप्रसंगीे,डॉ बांगर,रघुनाथ बडे, सूर्यभान साखरे,दीपक साखरे,कालिदास राजगुरू,बंडू बडे,विलास राजगुरू,पंढरीनाथ साळुंके,भगवान रंधवे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भागीनाथ बडे,प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू खाडे हे होते.सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक संतोष सापते यांनी केले. तर आभार शाळेच्या शिक्षिका अलका दुसंग मॅडम यांनी मानले.