संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
देशात हृदयविकार महामारीसारखे पसरत आहेत. देशातील युवा लोकसंख्या अत्यंत वेगाने त्याच्या विळख्यात सापडत आहे. लँन्सेट व आयसीएमआरनुसार, हृदयरुग्णांपैकी २०% लोक चाळिशीजवळचे आहेत. यामागे खाण्यापिण्यात अनियमितता, तणाव, वायू प्रदूषण, लठ्ठपणा व धूम्रपान सर्वात मोठी ही कारणे आहेत. भारतात लोकांना विकसित देशांच्या १० वर्षांआधीच हृदयरोग जडत आहेत. अमेरिकेच्या तुलनेत कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याचा धोका ३-४ पटींनी जास्त आहे. चीनपेक्षा तो ६ पट अधिक व जपानपेक्षा २० पट जास्त आहे. भारतात हृदय रुग्णांचे सरासरी वय ५३ वर्षे तर, विकसित देशांत ते ६३ वर्षे आहे.
या सहा कारणांवर तत्काळ उपाय हवा
दोन दशकांपासून तरुणांत हृदयविकार वाढण्यामागील सर्वात मोठे कारण जीवनशैली आहे. तरुणांना हृदयविकार जडण्याची ही प्रमुख कारणे…
– खाणेपिणे 56.4%
– रक्तदाब 54.6%
– वायू प्रदूषण 31.1%
– हाय कोलेस्टेरॉल 29.4%
– धूम्रपान 18.9%
– लठ्ठपणा 14.7%
बचावाचे ३ सोपे उपाय
1. एम्स दिल्लीमध्ये हृदयविकार विभागाचे डॉ. संदीप मिश्रा म्हणाले, रोज १० हजार पावले चालले पाहिजे.
2. आठवड्यांत ५ दिवस ४५ मिनिटे घाम गाळणारा व्यायाम करा. वेगात पायी चालणे हाही चांगला पर्याय आहे.
3. ७० हजार महिलांवरील संशोधनात आढळले की ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना हृदयविकाराचा जास्त धोका असतो. अपुऱ्या झोपेमुळे तणाव वाढवणारे हार्मोन्स वाढतात. रक्तदाब व शुगर लेव्हलवरही परिणाम होतो. यामुळे ७ तासांची झोप पूर्ण करावीच.
धक्कादायक चार तथ्ये
1) इंडियन हार्ट असोसिएशन- नुसार हार्टअॅटॅक येणाऱ्या भारतीय पुरुषांपैकी ५०% लोकांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असते. २५% लोकांचे वय ४० पेक्षाही कमी असते.
2) मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथनुसार, भारतात हृदयविकारांमुळे जेवढे मृत्यू होत आहे, त्यापैकी एकूण ५७% हृदयविकारग्रस्त मृतांचे वय सुमारे २५ ते ६९ वर्षांदरम्यानचे आहे.
3) देशात १९९० मध्ये एकूण हृदयरुग्णांची संख्या केवळ २ कोटी ५७ लाख होती. ती २६ वर्षांत वाढून ५.४ कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
4) भारतात विविध आजारांमुळे जेवढे मृत्यू होतात, त्यात सर्वाधिक २८.१ टक्के मृत्युचे कारण हृदयविकार आहे. याउलट १९९० मध्ये एकूण मृत्यंूत में हृदयविकाराचा वाटा १५ टक्क्यांजवळ हाेता.