‘चला जाणू या नदीला’ उपक्रमांतर्गत नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : ‘चला जाणू या नदीला’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्ह्यातील सर्व नदी प्रहरी ची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी (दि.१५) झाली.
या बैठकीत उपवनसंरक्षक अधिकारी श्रीमती सुवर्ण माने, जिल्हा जलसंधारण अधिकारी व जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्व नदीच्या पुनर्जिवना संदर्भातील कामांबाबत चर्चा झाली. तसे संबंधितांकडून अहवाल मागवण्यात आले. त्याबरोबर नदी संवाद यात्रेच्या बजेटवर चर्चाही झाली. लवकरात लवकर हे बजेट सादर करण्यात येणार आहे.
यावेळी जलबिराद्ररीचे नरेंद्र चुग अगस्ती नदीचे नदीप्रहरी आदिनाथ ढाकणे, मोती नदीचे नदीप्रहरी मनोज साठे, आढळा व माळुंगी नदीचे नदीप्रहरी विठ्ठलजी शेवाळे, सुभाष देशमुख आणि संपत देशमुख उपस्थित होते.