👉कोपरगाव येथे दि.२१ ऑक्टोबरला गोदावरीच्या काठावर कलश पूजन व गोदावरी मातेचे पूजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- ‘चला जाणूया नदीला’ या समितीचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते कलश आणि तिरंगा ध्वजाचे औपचारिक अनावरण करून घेतले . यानंतर या समितीच्या सचिव जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने यांच्या हस्ते कलश आणि तिरंगा ध्वजाचे औपचारिक अनावरण केले. यावेळी अगस्ती नदी या परिक्रमे संदर्भात औपचारिक नियोजन बैठक झाली. या बैठकीस अगस्ती नदी परिक्रमेचे समन्वय तथा गोदामाई प्रतिष्ठान अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, डॉ. वसुदेव साळुंखे हे उपस्थित होते.
कोपरगाव येथे दि.२१ ऑक्टोबर रोजी गोदावरीच्या काठावर कलश पूजन व गोदावरी मातेचे पूजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रांतधिकारी गोविंद शिंदे, सिने अभिनेते गोदामाई पुत्र पर्यावरण प्रेमी ब्रँड अँबेसिडर जलबिरारदरी चिन्मय उदगीरकर आणि महाराष्ट्र समन्वयक राजेश पंडित हे उपस्थित राहणार आहेत.
‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमा अंतर्गत जलबिरारदरी आणि महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने अगस्ती नदीची परिक्रमा व अभ्यास दौरा यासाठी गोदामाई प्रतिष्ठान अध्यक्ष आदिनाथ गोरखनाथ ढाकणे व डॉ. वसुदेव शिवाजी साळुंखे यांची जलबिरारदरी आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने निवड करण्यात आली आहे . अगस्ती नदीच्या परिक्रमेसाठी निवड झाल्यानंतर वर्धा येथे डॉ. राजेंद्र सिंग (जलपुरुष) यांनी कलश व तिरंगा देऊन या मोहिमेला सुरुवात करून दिली आहे. अगस्ती नदी ही अंकाई टंकाई डोंगरावर उगम पावते आणि कोपरगाव तालुक्यातील सोनारी गावाजवळ गोदावरी नदीला मिळते .