घातकशस्त्र बाळगणा-यास राहुरी पोलिसांनी केले अटक

घातकशस्त्र बाळगणा-यास राहुरी पोलिसांनी केले अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहुरी : घातकशस्त्र बाळगणा-या एकास राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरज कृष्णा मंडलिक (वय २३, रा. बारगाव नांदूर ता. राहुरी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार पोउपनि समाधान फडोल, एएसआय लक्ष्मण औटी, पोहेकॉ राहुल यादव, पोना प्रवीण बागुल ,पोकॉ ढाकणे , पोकाॅ नदीम शेख, पोकाॅ भगवान थोरात, पोकाॅ नवले यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.


दि.३ फेब्रुवारी २०२४ ला राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की, बारगाव नांदूर गावातील शिवाजी चौकात एकजण तलवार जवळ बाळगून फिरत आहे. माहितीची शहानिशा करणे कामी व योग्य कारवाई करण्याकामी पथक नेमले असता पथकास सुरज कृष्णा मंडलिक (वय २३, रा. बारगाव नांदूर ता. राहुरी) हा माहितीप्रमाणे तलवार बाळगताना मिळून आला. त्याच्यावर शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सफौ लक्ष्मण औटी हे करत आहे.

राहुरी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अवैध्य शस्त्राबाबत काही माहिती असल्यास पोलीसांना माहिती द्यावी, नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!