संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये पंचायत समिती पाथर्डी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत शिरापुर, करडवाडी, तसेच सातवड या ठिकाणी सध्या कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी संपत गोल्हार यांना पंचायत समिती शेवंगाव येथे उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्त त्यांचे मूळगाव करोडी (ता.पाथर्डी) येथे शनिवारी (दि.३.) ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच आश्रू खेडकर व मा.प.समिती सदस्य डॉ.राजेंद्र खेडकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,व सन्मानचिन्ह देऊन गौरव करत जाहीर सत्कार करण्यात आला.
डॉ.खेडकर म्हणाले की, प्रत्येक अधिकारी यांनी जर गोल्हार यांच्याप्रमाणे इमानदारीने लोकांची सेवा केल्यास हा मागास असलेला ग्रामीण भागात विकास गंगा आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल.
यावेळी शिरापुरचे सरपंच नितीन लोमटे, एम्,डी, खेडकर, ज्ञानदेव खेडकर, बबन खेडकर, गहिनाथ शिरसाठ, बाळासाहेब भाबड, सतीश खेडकर मेजर, गहिनाथ केकाण, संजू वारे, संतोष वारे, उद्धव खेडकर, अमोल वारे, सहदेव खेडकर, नाना पाटील, रामकिशन भाबड,कृषी सहायक नारायण खेडकर, शेलार, बाबुराव खेडकर आदींसह ग्रामस्त उपस्थित होते.
गोल्हार यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे करोडी व परिसर तसेच पाथर्डी तालुक्यातून त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.खेडकर यांनी केले.त
आभार बाळासाहेब भाबड यांनी मानले.
✍संकलन-पत्रकार सोमराज बडे-९३७२२९५७५७