ग्रामपंचायत पोटनिवडणूक : संगमनेर ७४.६३ व अकोले ६७.०२ टक्के मतदान

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी –
संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यातील ५ ग्रामपंचायत जागांसाठी ७४.६३ टक्के मतदान पार पडले. तर अकोले तालुक्यातील ४ ग्रामपंचायत जागांसाठी ६७.०२ टक्के मतदान पार पडले.  सर्वत्र मतदानासाठी उत्साह दिसून आला. अत्यंत सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.

संगमनेर उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांंच्या मार्गदर्शनाखाली आजच्या पोटनिवडणूकांसाठी प्रशासनाने तयारी केली होती. संगमनेर तहसीलदार अमोल निकम व अकोले तहसीलदार सतीश थेटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली. संगमनेर तालुक्यात ३५ निवडणूक कर्मचाऱ्यांची यासाठी नेमणूक करण्यात आली होती. तर ५ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. अकोले तालुक्यात यासाठी ४ मतदान पथके, प्रत्येक पथकात ६ कर्मचारी व याशिवाय २ राखीव पथके नियुक्त करण्यात आली होती. ईव्हीएम मशीनद्ववारे मतदान घेण्यात आले.

👉संगमनेरमधील समनापूर, कुरकुटवाडी, ओझर खुर्द आश्र्वी बु.,वडगांवलांडगा या ५ ग्रामपंचायत जागेसाठी ५ मतदान केंद्रावर मतदान आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान पार पडले. पुरूष १२३७ व स्त्रीया १२०१ असे २४३८ मतदारांनी मतदान केले. एकूण ७४.६३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ८१.८५ टक्के मतदान समनापूर ग्रामपंचायतीत झाले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १९ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बोरबन, म्हसवंडी, व मिरपूर या ३ ग्रामपंचायतीमधील ५ जागांसाठी एकही अर्ज प्राप्त नाही. तर खराडी, चिंचपूर, मिर्झापूर, पळसखेडे, काकडवाडी, निमगांवटेंभी, कोंची मांची, मिमगांवजाळी या ८ ग्रामपंचायतीच्या ८ जागा बिनविरोध करण्यात आल्या आहेत.
अकोले येथे ४ ग्रामपंचायत जागांसाठी ६७.०२ टक्के  मतदान झाले. पुरूष  ९६० व स्त्रीया ८५९ असे एकूण १८१९ जणांनी मतदान केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!