गोवंशीय जनावराची कत्तल करणा-या ७ जणांवर कारवाई, १ लाखांचा मुद्देमाल जप्त ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : अहमदनगर शहरामध्ये गोवंशीय जनावराची कत्तल करणा-या सातजणांवर कारवाई करुन १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी नगर एलसीबी टिम’ने केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगर एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव, पोलीस अंमलदार विश्वास बेरड, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, अतुल लोटके, पंकज व्यवहारे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, मयुर गायकवाड, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, विशाल तनपुरे, प्रमोद जाधव,, अमोल कोतकर, अरुण मोरे आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे. एलसीबी टिम’ दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगर शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोलीसांना माहिती मिळाली झेंडीगेट (अहमदनगर) येथे गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत आहेत. या माहितीनुसार रात्री ३.३५ वाजण्याच्या सुमारास जाऊन खात्री करता त्या ठिकाणी गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणणारे सातजण अंधारामध्ये गल्लीबोळातून पळून गेले. पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली, असता तेथे १ लाख २ हजार रुपये किमतीची २३ मोठी गोवंशीय जनावरे, ८ लहान वासरे, व अंदाजे १५० किलो गोवंशीय जनावरांचे खराब मांस आढळून आले.
पोलिसांनी पळून गेलेल्यांची माहिती काढली असता पळून गेलेल्यांची नावे रोहिमुद्दीन महेबुब कुरेशी (रा. झेंडीगेट, अहमदनगर), वसीम अस्लम तांबोळी (रा. कोठला, झेंडीगेट अहमदनगर), शैबाज मजिद कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला अहमदनगर), अरबाज गुलाम कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, अहमदनगर),आल्फेज फारुक कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, अहमदनगर), सलीम शब्बीर कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, अहमदनगर), मुसा कादर शेख (रा. कोठला, अहमदनगर) असे असल्याचे समजले.
जणांविरुद्ध एलसीबीचे पोकॉ रविंद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं. १०७३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३ (५) महाराष्ट्र महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारित २०१५ चे कलम ५ (अ)(ब) (क) ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे.