संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – नव्याने दाखल झालेले कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख असणारे पोनि चंद्रशेखर यादव यांचे कोतवाली पोलिस ठाण्यात आगमन होताच, कारवाईचा बडगा सुरू झाला आहे. या कारवाईत गोमांस विक्री करणा-यांवर कोतवाली पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोसई मनोज कचरे, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोकाॅ. संदिप थोरात, पोकॉ. कैलास शिरसाठ, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ अमोल गाढे, पोकॉ.सुजय हिवाळे, पोकाॅ सागर मिसाळ आदिंच्या टिम’ ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.४ मार्च २०२३ रोजी सकाळी कोतवाली पोलीसांना माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील कारी मशिदीजवळ व सुभेदारगल्ली येथे गोवंशिय जनावरांच्या मांसाची विक्री केली जात आहे, अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोसई मनोज कचरे हे त्यांचे टिमसह झेंडीगेट परिसरातील माहितीतील ठिकाणी जाऊन खात्री केली. दोन्ही ठिकाणी मांस विक्री करणाऱ्याच्या समोर लहान मोठे आकाराचे मांसाचे तुकडे लटकवलेले दिसले. पथकाची खात्री होताच तेथे छापा टाकून दोन्ही ठिकाणीच्या ताब्यात घेऊन त्याना त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे साहेल जावेद कुरेशी (वय २६, रा व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहमदनगर), शहेबाज गुलामसाबीर सय्यद (वय १९, रा व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्या पत्र्याचे टपरीची झडती घेतली. या दरम्यान तेथे त्या ठिकाणी १ लाख १० हजार रु किंमतीने लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे तुकडे सुमारे ५५० किलो वजनाचे गोमांस, दोन सत्तुर व दोन वजनकाटे असा एकूण १ लाख ११ हजार रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुरनं २१५/२०२३२) गुरनं २१६ / २०२३ भादंवि कलम २६९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(अ),(क). ९ (अ) प्रमाणे २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास हा पोहेकॉ रायचंद पालवे व पोना परवेझ इनामदार हे करीत आहेत.