संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोपरगाव – शहरातून वाहणाऱ्या पवित्रा अशा गोदावरी नदीची गेल्या २०१ आठवड्यापासून अविरतपणे स्वच्छता करणाऱ्या गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करावे, तितके कमीच असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा वनाधिकारी सुवर्णा माने यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने गोदावरी नदी पात्राची २०१ आठवडे स्वच्छता पूर्तीच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हावन अधिकारी सुवर्णा माने, कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, प्रसिद्ध सिने अभिनेता किरण भालेराव, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, के.जे सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एस यादव, एस एस जी एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल, नमामी गोदानासिक चे राजेश पंडित, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे, एस जी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोराहळकर, उदगीर नगरपालिकेचे अधिकारी महारुद्र गालट, पीपल्स बँकेचे संचालक सत्येंन मुंदडा यांच्यासह विजय सांगळे, अनिल भाबड, सौरभ मुंगसे, निलेश पाटील, सोमनाथ पाटील, सुनीता इंगळे, प्रदीप गुरळी, अशोक नरोडे, बळीराम साठे, गिरमकर सर, आबासाहेब देव, सृष्टी देव, सुधीर डागा, नितीन पोळ, तुषार विध्वंस, मनोज साठे, बंटी पगारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश कातकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर, दिलीप सारंगधर, प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे यांच्यासह के.जे सोमय्या, एस एस जी एम, संजीवनी इंजिनिअरिंग, कन्या विद्यालय आदी महाविद्यालयातील एन.सी.सी व एन. एन.एस चे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हा वनाधिकारी सोनवणे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोपरगावातील गोदामाई प्रतिष्ठान तर्फे राबवत असलेला गोदावरी नदी स्वच्छता उपक्रम अतिशय सुंदर असून ढाकणे व त्यांच्या सर्व टीमचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे बोलून सोनवणे यांनी गोदामाई प्रतिष्ठान करीता सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले की, ढाकणे व त्यांच्या सर्व टीमचे गोदावरी स्वच्छता अभियानाचे सातत्य एक अभिमानास्पद बाब असून येणाऱ्या काळात गोदामाई प्रतिष्ठान कोपरगाव तालुक्यातील २६ गावातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना मार्गदर्शन करत गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे या साठी शासन देखील त्यांना सहकार्य करेल असे आश्वासन सूर्यवंशी यांनी देत सर्व टीम ला शुभेच्छा दिल्या.
सिने अभिनेता किरण भालेराव यांनी आदिनाथ ढाकणे यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देत त्यांचा हा उपक्रम एक मुखी न राहता सर्वांनी कृतीशील पणे यात सहभागी व्हावे हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे नागरिक म्हणून आपण स्वतः नदी प्रदूषित करणार नाहीत व इतरांना करून देणार नाहीत यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी चळवळ उभी करावी व याचे अनुकरण स्वतः व स्वतःच्या परिवारापासून करावे असे आवाहन या प्रसंगी भालेराव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
राजेश पंडित यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत भविष्यात देखील या उपक्रमाच्या अनुषंगाने गोदावरी ट्रस्ट यांच्यासोबत राहून सदैव मार्गदर्शन करत राहू असे आश्वासन दिले.
पद्माकांत कुदळे यांनी बोलताना सांगितले की, या भूतलावर भरपूर प्रमाणात पाऊस व हिरवळ पाहिजे असेल तर नद्या वाचल्या पाहिजे यासाठी सामाजिक संस्थांनी जनजागृती करणे अपेक्षित असून कोपरगाव येथील युवक आदिनाथ आपल्या गोदामाई प्रतिष्ठान मार्फत करत असलेले कार्य महान असून त्यांना आवश्यक ती मदत करेल असे आश्वासन देत शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी के.जे.सौमय्या कॉलेज आणि गोदामाई प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी गोदामाई ची व्याथा हे पथनाट्य सादर केले व आलेल्या सर्वाना गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याची शपथ दिली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थिताचे आभार गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी व्यक्त केले.