गुंडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र

👉सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याचे झाले सिद्ध
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
सरकारी जागेवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचे सिध्द झाल्यामुळे नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील सरपंच मंगल संतोष सकट यांना ग्रामपंचायत सदस्यपदावर राहाण्यास अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी काढले.

गुंडेगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी दि.‌१५ जानेवारी २०२१ रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत मंगल सकट या सदस्यपदी निवडून आल्या. सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्या एकमेव उमेदवार असल्यामुळे त्या सरपंचपदी विराजमान झाल्या. गुंडेगाव येथील दादासाहेब राजाराम जावळे या व्यक्तीने त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. सरपंच मंगल सकट यांनी स्वतः व त्यांचे पती संतोष लिंबा सकट यांनी, सरकारी जागेचे अतिक्रमण करीत घराचे बांधकाम केले. या जागेचा ते उपभोग घेत आहेत. त्यामुळे त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशा आशयाची तक्रार १६ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झाली होती.
सदस्या मंगल संतोष सकट यांना १९९९ ते २००० या कालावधी इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून २६० चौफूट घरकूल मंजूर झाले. त्यांनी त्यापेक्षा अधिक जागेवर घर बांधले. या तक्रारीनुसार नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
अर्जदार जावळे यांचा लेखी युक्तीवाद, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रके, तसेच गटविकास अधिकारी यांचे अभिप्राय व तहसीलदार यांचे स्थळनिरीक्षण अहवालावरुन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ज-३) मधील तरतुदीनुसार मंगल संतोष सकट यांना सदस्यपदी राहाण्यास अपात्र ठरविण्यात येऊन त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
या आदेशाविरोधात नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्याकडे १५ दिवसांत अपिल करण्यास मुभा देण्यात आलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!