गावठी दारु हातभट्या भिंगार कॅम्प पोलीसांनी केल्या उध्वस्त ; दोघांनाही केले हद्दपार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
भिंगार कॅम्प पोलास ठाणे हद्दीतील दोघांना केले हद्दपार
भिंगार कॅम्प पोलास ठाणे हद्दीतील दोघांना हद्दपार केले आहे.निलेश उर्फ काळ्या मारुती जायभाये (रा. त्रिमुर्ती चौक सारसनगर ता, जि अहिल्यानगर), आन्या उर्फ आनंद राजेंद्र नायकु (रा नेहरु चौक माळगल्ली भिंगार ता, जि अहिल्यानगर) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, अहिल्यानगर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार सफौ कैलास सोनार, पोहेकॉ संदिप घोडके, दिपक शिंदे, रवी टकले, गोल्हार, कासार, पोकों प्रमोद लहारे, समिर शेख आदींच्या टिमने ही कारवाई केली.
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा निवडणूक व मतमोजणी असल्याने सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, या अनुशंगाने पोलीस ठाणे हद्दीतील निलेश उर्फ काळ्या मारुती जायभाये (रा. त्रिमुर्ती चौक सारसनगर ता, जि अहिल्यानगर), आन्या उर्फ आनंद राजेंद्र नायकु (रा नेहरु चौक माळगल्ली भिंगार ता, जि अहिल्यानगर) या दोघांना हद्दपार केल्याबाबतचा आदेश नगर भाग अहिल्यानगर सुधीर पाटील यांनी पारीत केला. हद्दपार इसमांना ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दी बाहेर सोडण्यात आले आहे.
गावठी दारु हातभट्या भिंगार कॅम्प पोलीसांनी केल्या उध्वस्त
भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोघी महिलांवर कारवाई करुन
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदिश मुलगीर यांच्या सूचनेनुसार सफौ अजय नगरे, पोहेकॉ संदिप घोडके, दिपक शिंदे, रवी टकले, मपोहेकों मिना गहीले, पोकॉ प्रमोद लहारे, समिर शेख मपोकॉ तृप्ती कांबळे आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि जगदिश मुलगीर यांना माहीती मिळाली की, कापुरवाडी शिवारात दोन महिला गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन व गावठी हातभट्टीची दारु तयार करुन तिची विक्री करत आहे. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदिश मुलगीर यांनी तपासी टीमला कारवाईच्या सूचना दिल्या. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या तपासी टीमने माहिती ठिकाणी जाऊन सापळा रचून छापा टाकला, या दरम्यान त्या ठिकाणी असणारी महिला ही पळून जाण्याच्या तयारीत असतांना तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या तब्यातील ३८ हजार रु किमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायन व गावठी हातभट्टीची तयार दारु विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगतांना मिळून आली. तिला नाव, गाव विचारले असता त्यांनी तिचे नावे सांगितले. त्या महिलांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.