गांधी मैदान परिसरातील अनेक वर्षाचा पावसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार : आ.संग्राम जगताप

गांधी मैदान परिसरातील अनेक वर्षाचा पावसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार : आ.संग्राम जगताप

चितळे रोड जिल्हा वाचनालय, पटवर्धन चौक ते नालेगाव अमरधाम गेट पर्यंत भुयारी गटार व रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न.चितळे रोड जिल्हा वाचन

 संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर : शहर विकासाचे नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे सुरू असल्यामुळे एकदा केलेली कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. गेल्या पन्नास वर्षांपासून पाऊस पडला की मंगल गेट परिसरापासून चितळे रोड, गांधी मैदान, पटवर्धन चौक, आनंदी बाजार , गाडगीळ पटांगण या परिसरामध्ये अक्षरशा नदीचे स्वरूप येत असते. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाची पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. माजी सभापती किशोर रागवले यांनी शिवरत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते. काम करीत असताना विरोध होत असतो त्याकडे दुर्लक्ष करीत विकासाची प्रश्न मार्गी लावली जात आहे. शहर विकास आरखडा मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रुपये मिळाले आहे. या व्यतिरिक्तही शहरात विविध विकास कामे सुरू आहेत तारकपूर रस्त्यासाठी 18 कोटी रुपये मंजूर केले असून ते काम प्रगतीपथावर आहे. याचबरोबर केडगाव उपनगर परिसरामध्ये सुमारे 100 कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. या माध्यमातून विकासाला चालना मिळाली आहे. आनंदी बाजार येथे महिलांसाठी आमदार निधीतून जिमची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
चितळे रोड जिल्हा वाचनालय पटवर्धन चौक ते नालेगाव अमरधाम गेट पर्यंत भुयारी गटार व रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक दत्तात्रेय मुदगल, माजी नगरसेविका सोनाली चितळे, प्रा. माणिकराव विधाते, प्रा. अरविंद शिंदे, मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, अजय चितळे, विकी वाघ ,सागर गोरे, रोहन डागवाले,सुनील सूर्यवंशी ,सचिन भिंगारकर, आशा डागवाले, सुहास मुळे, गोरख डागवाले, दामोदर भोसले, मंदार पळसकर, सतीश ताठे, बाळासाहेब भुजबळ, रणजीत सत्रे, बापूराजे भोसले, रवींद्र कवडे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!