गंभीर २९ दाखल गुन्ह्यातील आरोपी पकडले ; नगर तालुका व एलसीबी पथकाची कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाई नेटवर्क
अहमदनगर-
गंभीर २९ दाखल गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात अहमदनगर  स्थानिक गुन्हे शाखेच्या व नगर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप, पोसई  युवराज चव्हाण, पोसई रंणजित मारग, पोसई सोपान गोरे,  सफौ धुमाळ, पोहेकॉ  गहाणे, पोहेकॉ गांगर्ड, पोहेकॉ सोनवणे, पोहेकॉ लबडे, पोना कदम, पोना राहुल शिंदे, पोहेकॉ खेडकर, पोकाॅ जाधव, मपना संगिता बडे, मघोना फुंदे, मपोना धनवडे, मपोकाॅ पवार, पोकाॅ भालसिंग, पोकाॅ टकले, पोकाॅ खिळे, पोकाॅ वडणे, पोकॉ बांगर, पोना माने पोना ठानगे आणि  स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकाॅ सुनिल चव्हाण, पोहेकाॅ दत्ता सिंगचे, पोहेकॉ बेरड, पोना ससाणे, पोना दरंदले, येमुल, दळवी, घुगांसे, दळवी, लोंढे,  सोळंके, माने, अडबल आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर तालुका पोलीस ठाण्यात  1-६३३/२०२९ भादवि ३००,३५३,३३२,३३६,१४४९२७ मधील फिर्यादी पाहेकाॅ भरत बाजीराव धुमाळ हे नेप्ती बीट हद्दीत कामरगाव येथे गुन्ह्याच्या तपासाच्या सरकारी काम करीत असतांना आरोपी याने पोलीसांनी अटक करू नये, म्हणून गैरकायदयाची लाकडी दांडक्याने दगडाने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा हा दि. १७ नोव्हेंबर २०२९ गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील आरोपी फरार झालेले असून फिर्यादीवरून दाखल गुन्हयातील आरोपी सावत्या ऊर्फ सावत अकल्या भोसले ( रा.पिंपळगाव कौडा, ता. जि. अहमदनगर) व त्याचे साथीदार असे फरार झाले होते. आरोपीविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात  तसेच इतर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडी चोरीसह अन्य गुन्हयाचा तपास सपोनि राजेंद्र सानप हे करीत होते.

गुन्ह्यातील  फरार आरोपी  रमेश सावत्या ऊर्फ सावंत भोसले (वय ३१),  अविनाश सावंत ऊर्फ माया भोसले (वय १९ ) व एक महिला आरोपी (सर्व कौडा ता.नगर) हे कामरगाव येथे येणार असल्याची  माहीती सपोनि राजेंद्र सानप यांना मिळाली. माहितीनुसार मंगळवारी ( दि.१२) पहाटे सापळा लावून तिन्हीही आरोपीना अटक करण्यात आली. आरोपी हे अनेक गुन्हयात  फरार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!