सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव-पाथर्डी: अहमदनगर जिल्ह्यतील शेवंगाव तालुक्यात असलेल्या गंगामाई कारखान्याच्या डीस्लेरी प्रकल्पास भीषण आग लागल्याची घटना आज (ता.२४ )रोजी सायंकाळी घडली आहे. ही आग अतिशय भीषण असल्याचे सांगितले जात आहे. या आगीमध्ये कारखान्याचा खूप मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे आटोक्यात प्रयत्न सुरू आहेत.
शेवगाव, पैठण,पाथर्डी,तसेच नगर येथूनही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब बोलावून घेतले आहेत. कारखान्याचा परिसर निर्मनुष्य केला असून त्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या आगीमध्ये अद्याप काही जीवितहानी झाल्याची कोणताही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
शेवगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्यासुमारास मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीने रौद्ररुप धारण केले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून कारखान्याच्या परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात येत आहे. कारखान्यातील इथेनॉलनमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकत आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारखान्यातील कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.
या आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी कारखाना प्रशासन मोठी कसरत करत असून सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.