संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एल एस पाढेन यांनी खोटी साक्ष देणार्या साक्षीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच पारित केले
याबाबत समजलेली माहिती अशी की, असे की अहिल्यानगर येथील एका मिळकती संदर्भात अश्रू यादव नरोटे व नरेश विष्णुपंत कोडम आणि जय श्री नरेश कोडम यांच्या दरम्यान दिवाणी न्यायालयांमध्ये दावा प्रलंबित आहे. त्या दाव्यामध्ये रुपेश प्रकाश कोडम यांनी नरेश विष्णुपंत कोडम व जयश्री नरेश कोडम यांच्या वतीने न्यायालयात हजर राहून साक्ष दिली. साक्षीमध्ये ते एका दस्तासाठी उपस्थित असल्याचे न्यायालयात साक्ष देताना शपथ पूर्वक सांगितले. दरम्यान अश्रू यादव नरोटे यांनी माहितीच्या अधिकारात व्यक्ती हा साक्ष देताना ज्यावेळी उपस्थित होतो, असे सांगितले. त्यावेळी तो त्याच्या शासकीय सेवेच्या रजा घेतलेली नसल्याची बाब माहितीच्या अधिकारातील कागदपत्र न्यायालयासमोर सादर केली. त्याप्रमाणे न्यायालयात नरेश विष्णुपंत कोडम जय श्री नरेश कोडम रुपेश प्रकाश कोडम यांनी संगनमताने कट करून खोटा पुरावा तयार करण्याच्या इराद्याने खोट्या साक्षी दिल्या, अशा स्वरूपाची भादवी कलम 120,196,199,468,464,463,465,4 71 सह 34 प्रमाणेखाजगी फिर्याद दाखल करून साक्षीदाराने खोटी साक्ष देऊन न्यायालयाची दिशाभूल केली. आश्रू यादव नरोटे यांच्या मिळकती संदर्भात खोटा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला, अशा स्वरूपाची फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीच्या अनुषंगाने न्यायाधीश एल एस पाडेन यांनी भिंगार पोलीस ठाण्यात यांना आदेश देऊन त्यांच्याकडून प्रथमतः त्याबाबी संदर्भात अहवाल मागविला होता, अहवाल न्यायालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने अहवालाचे अवलोकन करून फिर्यादी अश्रू यादव नरोटे यांच्या अर्जाप्रमाणे बी एन एस 175 प्रमाणे भिंगार पोलीस ठाणे यांनी त्यांची फिर्याद दाखल करून घेऊन त्याप्रमाणे तपास करण्याबाबत आदेश केलेले आहेत. फिर्यादी अश्रू यादव नरोटे यांची वतीने गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला, त्यांना अॅड. गुरविंदर पंजाबी, रोहित बुधवंत, सागर गरजे, प्रवीण निंबाळकर, विवेक बडे, धनश्री खेतमाळीस, विशाल वां ढेकर, राहुल दहिफळे, रोहित चांडवाले, अपेक्षा बोरुडे, पुष्कराज बिडवाई, तेजस राख, बाळकृष्ण गीते यांनी सहाय्य केले.