👉ग्रामस्थांनी निवेदन देऊन दिला इशारा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा होत नसून, विकास कामासाठी येणा-या निधीबाबत ग्रामस्थांना समजत नाही, याचा फायदा त्या त्या संबंधित ग्रामपंचायतीचे थातुरमातुर कामे करून उर्वरित निधीवर सरपंच, ग्रामसेवक आणि काही अपवाद अंगठे बहाद्दर सदस्य डल्ला मारण्याचे काम करीत आहेत. परंतु स्थानिक पुढा-यांना घाबरत असल्याकारणाने वास्तव तक्रारी करण्यासाठी सहसह पुढे कोणी येत नाही, मांजराच्या गळ्यात घंटी कोणी बांधायची ?, या परिस्थितीमुळे आजही अनेक ग्रामपंचायतींमध्ये सावळागोंधळ आहेच, पण काही अपवाद गावात ग्रामपंचायत म्हणजे जणू त्याचीच वतनदारी असल्यागत गावातील ग्रामस्थांबरोबर त्याचे व्यवहार आहेत.
यामुळेच खरवंडी येथील काही जागृत नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतीने ग्रामसभा घ्यावी, यासाठी थेट जिल्हाधिका-यापासून ते सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
खरवंडी कासार ग्रामस्थाच्या विविध अडचणी आहेत त्या प्रश्नाच्या सोडवणुक व्हावी. विविध विषयावर व अडचणी वर चर्चा होण्यासाठी खरवंडी कासार ग्रामपंचायतने ग्रामसभा लवकर आयोजित करावी अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपा अल्पसंख्यांक आघाडी चे जिल्हा उपध्यक्ष रशीद तांबोळी व भारतिय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुजित जगताप टायगर फोर्सचे अध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी निवेदन देऊन दिला आहे.
खरवंडी कासारचे सरपंच प्रदीप पाटील, ग्रामसेवक हनुमंत खेडकर, ग्रामपंचायत सदस्य युसूफभाई बागवान, सचीन ढोले यांना निवेदन दिले.
निवेदनात घरकुल ‘ड’ प्रत्रक यादीचे वाचन करणे व लाभार्थी कायम करणे यादीमध्ये काही लाभार्थी अपात्र झालेले आहे. त्यांचे कारण समजणे महत्वाचे आहे. गावातील बंधीस्त गटारीचे काम कधी होणार, रस्ते कधी होणार, गावाची अवस्था बिकट झालेली आहे. खराब रस्ते, दुर्गंधी, आठ महिन्यापासून स्वछता कामगार गायब आहेत. मोठया प्रमाणात झालेला कचरा, घाण त्यामुळे ‘डासा’चे प्रमाण वाढले.
मागील ५ वर्षात १४ वा वित्त आयोगातील झालेल्या कामाची व खर्चाची चर्चा करणे दि. ८ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयाचे वाचन करणे १५ वित्त आयोगाच्या निधी बाबत चर्चा करणे मागील ५ वर्षात झालेल्या कामाची चौकशी करणे ग्रामनिधी खर्चाचे वाचन करणे, अशा विविध कारणासाठी लवकरात लवकर गावाची ग्रामसभा घेण्याची मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रति या जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.