खड्डे मुक्त शहराची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे ः आ.संग्राम जगताप

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः नगरकरांच्या सहकार्यातूनच विकासाची कामे पूर्ण होत असून पत्रकार चौक ते डीएसपी चौकापर्यंतचा तारकपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वाहतुकीसाठी खुला केला आहे तरी नागरिकांनी रस्त्यावरून फिरून पहावे व झालेल्या विकास कामांचा आनंद घ्यावा तारकपूर रस्त्यासाठी शासनाकडून 150 कोटी रुपये या व्यतिरिक्त 18 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. विकासाची कामे करीत असताना जमिनी अंतर्गातील ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याच्या लाईन, गॅस पाईपलाईन, विद्युत लाईन, टेलिफोन लाईन स्थलांतरित करावे लागतात. त्या मुळे कामांना वेळ लागत असून नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकासाची कामे मार्गी लावली जात आहे. 150 कोटी रुपये निधी अंतर्गत शहरांमध्ये 22 रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून यापैकी 6 रस्त्याची कामे सुरू केले आहे. पुढील 6 महिन्यांमध्ये सर्वच विकासाची कामे मार्गी लागले जातील व आपले विकसित शहर म्हणून ओळखले जाईल. तारकपूर रस्त्यावर सिव्हिल हॉस्पिटल, खाजगी हॉस्पिटल, जिल्हा न्यायालय, एस पी कार्यालय, ताराकपूर स्टॅन्ड असून मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणात दळणवळण होत असून आता कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावला आहे आता आपल्या सर्वांना खड्डे मुक्त शहराची निर्मिती करायची आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या टप्प्यातील तारकपूर काँक्रिटीकरण रस्ता वाहतुकीसाठी खुला करत लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, जितू गंभीर, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, दत्ता पाटील सप्रे, बाळासाहेब बारस्कर, योगेश ठुबे, मनोज दुल्लभ, उदय कराळे, डॉ.मनोज घुगे, महेश मद्यान, सुरेश हिरानंदानी, ठाकूर नौलानी, जयकुमार रनलानी, बब्बू नौलानी, कातोरे पाटील, प्रीतम नौलानी आदिसह नागरिक उपस्थित होते.

संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट आले होते त्यामुळे राज्य शासनाचा बहुतांश खर्च आरोग्य विभागावर झाला होता कोरोनाचे संकट दूर झाले आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळेच विकासाची कामे मार्गी लागत आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला आणि सर्वच क्षेत्रातील कामे मार्गी लागली जात आहे विकास कामांच्या माध्यमातून पुढच्या पिढीचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सुरू आहे शहरात केलेल्या विकासकामुळे नागरिक स्वागत करत सहभागही होत असून मी विकासकामातून विश्वास संपदान केला असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!