👉सावळीविहीर बु!! येथे ७ कोटी ७८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांची उद्घाटन, भूमिपूजन संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहाता : खंडकरी शेतकऱ्यांचा प्रलंबित महसूल समस्या म्हणजे राहिलेल्या वर्ग दोनच्या जमिनी त्या रद्द करून त्या जमिनी शेतकऱ्यांना वर्ग एक करून मिळाव्यात. दि गोदावरी शुगर मिल्स समीर सौमय्या यांच्या हद्दीत राहणाऱ्या सुमारे ४०० रहिवासी व दुकानदारांचा राहण्याची समस्या सोडविण्याची मागणी राहाता पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब जपे पा. यांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे केली.

राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु!! येथे ७ कोटी ७८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांची उद्घाटन, भूमिपूजन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. व माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पा.यांच्या हस्ते झाली, या आयोजित कार्यक्रमात श्री जपे हे बोलत होते. यावेळी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पा., ज्येष्ठ नेते साहेबराव जपे पा., सरपंच ओमेश जपे.पा., माजी सरपंच रमेश पा.आगलावे, जिजाबा पा.आगलावे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, जि.प.सदस्य, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदिंसह मान्यवर उपस्थित होते.