क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रशिक्षकाची खरी गरज – आ. संग्राम जगताप

👉मा.उपनगराध्यक्ष कै.कृष्णा भाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक संपन्न
👉’हमजा इलेव्हन’ ने पटकावले कै.कृष्णा भाऊ जाधव चषक

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर
शालेय शिक्षणाबरोबरच युवकांनी आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे आता क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे. याच बरोबर शासकीय नोकरी मध्ये खेळाडूंना आरक्षण उपलब्ध आहे.ध्येय निश्चित करून युवकांनी जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे खेळामध्ये हार-जीत ठरलेली असते तरी पराभूत संघाने ना उमेद न होता अधिक कष्ट करावे. मा.उपनगराध्यक्ष कै.कृष्णा भाऊ जाधव यांचे अष्टपैलू गुण युवकांना प्रेरणादायी आहे त्यांच्या स्मरणार्थ ॲड. धनंजय जाधव यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.खेळामुळे निरोगी व सुदृढ आरोग्य राखण्यास मदत होत असते.खेळा मध्ये योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.यासाठी चांगले प्रशिक्षक निर्माण होणे गरजेचे आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास खेळाडू नक्कीच यशाचे शिखर गाठेल असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केली.


 मा.उपनगराध्यक्ष कै.कृष्णा भाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ साई क्रिकेट क्लब व साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित क्रिकेट प्रिमियर लिग स्पर्धेचे पारितोषिक वितरण आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी डॉ.पारस कोठारी,ॲड.धनंजय जाधव, पांडुरंग गोणे, प्रताप जाधव, नंदू वाघ, बाबासाहेब पेंडभाजे, ॲड. दीनानाथ जाधव, आदिनाथ जाधव,प्रताप काळे, गौरव कचरे, गजेंद्र भांडवलकर, अंकुश चत्तर,सुनिल सुडके,राहुल मुथा,राकेश गवते,सुमित साळी, गणेश गायकवाड,राज कोंडके,किरण भंडारी, विशाल भालेराव,पुरुषोत्तम सब्बन,स्वप्निल अंकम,सचिन उदगीरकर तसेच आदी उपस्थित होते.
      यावेळी बोलताना डॉ.पारस कोठारी म्हणाले की, निरोगी शरीरासाठी व्यायामाची व खेळाची गरज आहे.कै.कृष्णा भाऊ जाधव यांनी नेहमीच युवकांच्या प्रगतीसाठी व करिअर करण्यासाठी खेळाच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करुन दिल्या,ॲड.धनंजय जाधव यांनी क्रिकेट प्रिमियर लिग स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले.ॲड.धनंजय जाधव यांचे आरोग्य व क्रीडा क्षेत्रामध्ये सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
        यावेळी बोलताना ॲड.धनंजय जाधव म्हणाले की,आमचे वडील कै.कृष्णा भाऊ जाधव यांच्या नावाने व साई क्रिकेट क्लबच्या वतीने यावर्षीपासून क्रिकेट प्रिमियर लिग स्पर्धेचे आयोजन सुरू केले आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना विविध संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करेल यावर्षी झालेल्या या स्पर्धेत हमजा इलेव्हन हा संघ विजय झाला तर उपविजेत्या म्हणून नॉन स्टॉप इलेव्हन हा संघ विजय झाला दरवर्षी भविष्यकाळात आशा स्पर्धेचे आयोजन केले जाईल असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!