१२ वी पास पण कमाई ५ कोटी; युवकला मुंबई पोलिसांकडून अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : online fraud भाजीपाला अथवा अन्य छोट्या धंद्यातून दिवसाला ५ कोटी रुपये कमवल्याचे आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात आले असेल, परंतु गैरप्रकार करून ५ कोटी रुपये तेही दिवसाला कमवित असल्याचा प्रकार समोर आला आहे. १२ वी पास असलेला एक युवक गैरमार्गातून दिवसाला ५ कोटी रुपये कमवित ह़ोता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका युवकाला हैदराबाद येथून अटक केली. या युवकाचे काम पाहून पोलिसही चक्रावून गेले.त्या युवकाच्या अटकेमुळे साईबर क्राईमचे अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
श्रीनिवास राव दादी (वय ४९) असे त्या आरोपी युवकाचे नाव आहे. तो मुळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. मुंबईतील बांगूरनगर पोलिसांच्या टीम’ने सायबर गुन्ह्याखाली श्रीनिवास या युवकाला हैदराबाद येथून एका आलिशान हॉटेलमधून अटक केली आहे. त्याच्याबरोबर आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या तेलंगणातील सायबराबाद येथील घरातून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दीड कोटी रुपये जप्त केले आहेत. या तपासात हजारो महिलांची छायाचित्रे, त्यांचे ईमेल आयडी, त्यांच्याशी चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स व लांबलचक संभाषणांचे तपशील पोलिसांच्या हाती लागले आहेत. यासह पोलिसांनी आरोपीची तब्बल ४० बँकेची खाती गोठवली आहेत.
असा घालायचे गंडा 👉
श्रीनिवास व त्याचे साथीदार लोकांना विशेषत: महिलांना फोन करायचे, आणि पोलीस असल्याचे भासवून गंडा घालायचे. ते लोकांना तुमच्या नावाने पाठवलेल्या कुरिअरमध्ये अधिकाऱ्यांना शस्त्रे अथवा ड्रग्स मिळाले आहेत. असे सांगितले जायचे. यानंतर त्या संबंधित व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढून नंतर सेटेलमेंटसाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करत, संबंधिताचे बँक डिटेल्स घ्यायचे, व समोरच्या व्यक्तीला गंडा घालायचे.
👉दररोज ५ ते १० कोटी रुपयांचे व्यवहार
श्रीनिवासच्या खात्यातून दररोज ५ ते १० कोटी रुपयांचे व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. या व्यवहारातील रक्कम क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून बदलून एका चिनी नागरिकाकडे पोहचवली जात होती. या टोळीचे मुंबई, कोलकाता, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतही नेटवर्क असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
मुलीचा विनयभंग करणाऱ्यास २ वर्षांची शिक्षा
Nagar Reporter
अहमदनगर – मुलीचा विनयभंग केल्याबद्दल रेहान उर्फ मोहम्मद अंजर रिजवान शेख (वय १९, रा. शेंडी, ता.नगर) याला २ वर्षे सक्त मजुरी व १० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैदेची शिक्षा अतिरिक्त व विशेष (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ठोठावली. विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा केळगंद्रे – शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
अल्पवयीन मुलगी (वय १४) ही ता. १८ जून २०२२ रोजी घरातून गायब झाल्यावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यता फिर्याद दिली होती. पीडित मुलीचा पोलिसांनी शोध घेतला असता, ती आरोपी रेहान उर्फ मोहम्मद अंजर रिजवान शेख याचे सोबत मिळून आली. पोलिसांनी तिचा जबाब घेतला त्यावेळी तिने सांगितले की, आरोपीने मला बळजबरीने लग्नाचे आमिष दाखवून घरातून घेऊन गेला. मुलीचा जबाब घेतल्यानंतर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम लावण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन मुलगी, तिचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वयासंदर्भात मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राहय धरून रेहान शेख याला शिक्षा ठोठावण्यात आली. पोलिस अंमलदार आर. व्ही. बोर्डे यांनी त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.
कोतवाली पोलिसांकडून गुन्हेगारांचे सर्च ऑपरेशन ; कोतवाली पोलीस ॲक्शन मोडमध्ये..
👉रात्री विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर धडक कारवाया
👉 दुचाकी चोर, अट्टल गुन्हेगार कारवाई दरम्यान ताब्यात
Nagar Reporter
अहमदनगर : कोतवाली पोलिसांतर्फे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी टवाळखोरांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. रात्री उशिरा बस स्थानक परिसरात तसेच शहरात इतर ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईच्या धडाका पोलिसांनी सुरू केला आहे. रात्री अपरात्री विनाकारण फिरत असलेल्या मोटरसायकल चालकांना अडवून कोतवाली पोलीस चौकशी करत आहेत. गुरुवारी रात्री (दि.४) पुणे बस स्थानक परिसरात उघड्यावर दारू पिणाऱ्या काही जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.
कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि राजेंद्र पिंगळे, सपोनि विवेक पवार, सपोनि गजेंद्र इंगळे, सपोनि मनोज कचरे, सपोनि मनोज महाजन, सुखदेव दुर्गे पोकाॅ योगेश भिंगारदिवे, अतुल काजळे, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, रियाज इनामदार, तन्वीर शेख, गणेश धोत्रे, संदीप थोरात, प्रमोद लहारे, कैलास शिरसाठ, अभय कदम, सलीम शेख, अनुप झाडबुके, ईश्वर थोरात, राहुल शेळके, सुमित गवळी, अशोक कांबळे, शरद धायगुडे, राजेद्र पालवे, बिल्ला इनामदार, अशोक भांड, अशोक सायकल, शरद धायगुडे, प्रशांत बोरुडे बोरुडे आदिच्या टिम’ने केली आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौका- चौकात रात्री उशिरा फिरणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. गुन्हेगारांकडे चाकू, तलवार अशी हत्यारे असतात. त्याचा धाक दाखवून ते लुटमार करतात. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे हद्दीतील परिसरात तसेच बस स्थानक परिसरात रात्री उशिरा विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. गेल्या आठवड्यात कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरा शहरातून वाहन घेऊन जाणाऱ्या इसमाकडून तलवार जप्त केली होती. माळीवाडा बसस्थानक, पुणे बसस्थानक व इतर चौकात रात्री विनाकारण मोटरसायकली वरून फिरणाऱ्यांना अडवून कोतवाली पोलीस चौकशी करत आहेत. वाहनांचे नंबर पोलिसांकडून तपासले जात आहेत. या शोध मोहिमेत पोलिसांना काही जबरदस्तीने मोबाईल चोरणारे मारहाण करून लुटणारे गुन्हेगार सुद्धा हाती लागले आहेत. संशयितरित्या फिरणाऱ्या तीन चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मोबाईल हिसकावणारा एक इसम पोलिसांनी अटक केला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे स्वतः आपल्या अधिकारी आणि पोलीस जवान यांच्यासह रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत आहेत.
👇👇👇👇👇
रात्री ११ नंतर उघड्या ६२ आस्थापनांवर कारवाई
दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या रात्री ११ नंतर उघड्या दिसल्यास कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ६२ लहान मोठ्या आस्थापनांवर कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही रात्री अकरानंतर दुकाने खुली ठेवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
👇👇👇👇
महिला, सर्वसामान्यांकडून कारवाईचे स्वागत
कोतवाली पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात आल्याने महीला तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी झाला असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी कोतवाली पोलीस प्रयत्न करीत आहेत.
👇👇👇👇
विनाकारण त्रास देणाऱ्यांची माहिती द्या : पोलीस निरीक्षक यादव
आपल्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी विनाकारण रात्रीच्या वेळेस गोंधळ घालणारे, दारू पीत बसणारे अथवा इतर बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्यांबाबत माहिती द्यावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.