” कोरोना लसी”ची जनजागृतीसाठी नाशिक ते पंढरपूर सायकलवारी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर –कोविड कोरोना लसीची जनजागृती करण्यासाठी नाशिक ते पंढरपूर ही सायकलवारी करण्यात आली. नाशिकमधील सायकलिस्ट फौंडेशनच्या अंतर्गत काम करणाऱ्या आदर फौंडेशनने हा उपक्रम सुरू केला. या सायकलवारीचे नगरकरांनी स्वागत केले.
त्यांनी कोरोना लसीसाठी विशेष असा असा ड्रेस कोड परिधान केला असून त्यावर कोविड कोरोनाची लस घ्यावी याप्रमाणेच कोरोना पळवा देश वाचवा, सायकल चालवा इंधन वाचवा असा संदेश दिला आहे.दर्शनी भागावर श्री पांडुरंगाची प्रतिमा आहे.
पंढरीच्या या सायकल वारीत नरेश काळे,किशोर माने,मनोज जाधव, रामदास सोनवणे,अतुल सोनवणे, श्रीराम पवार,अनिल वराडे,माधवराव पवार,रमेश धोत्रे,उत्तम पवार,रामनाथ सौंदाणे,दिलीप देवांग,नामदेव लोखंडे,राजाभाऊ रेड्डी प्रशांत कोल्हे अरुण थोरे यांचा समावेश आहे.
नाशिकच्या पवित्र गोदावरीगंगेत स्नान करून द्वारकामाई येथून शुक्रवारी सकाळी ६वाजता प्रस्थान झाले.याच दिवशी सायंकाळी ७ वा. नगरशहरात आगमन झाले.यावेळी नगरमधील सायकलवीरांनी त्यांचे स्वागत केले.शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सायकल वारकरी मुक्कामी होते. याप्रसंगी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला.
विविध सामाजिक संदेश देण्यासाठी गेल्या ८ वर्षांपासून नाशिक ते पंढरपूर ही सायकलवारी करतात. रोज १७५ कि.मी.प्रवास करण्याचे नियोजन असते.ते स्वखर्चाने ही वारी करतात.यामध्ये ३० ते ६८ वयोगटातील सायकलवीर आहेत.या सर्वांचे कोरोना लसीचे दोन टिकाकरण झालेले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाँकडाऊन मध्ये नर्मदा परिक्रमा केली.३हजार २००कि.मी.प्रवासासाठी त्यांना १महिना लागला.याआधी त्यांनी नाशिक ते पानिपत,शेगाव व कन्याकुमारी यासह विविध ठिकाणी सायकलवारी केलेली आहे.ही वारी करताना पंक्चरकिट सोबतच असते.त्यामुळे अडचणी जाणवत नाहीत.वर्षातून एकदा-दोनदा आदर फौंडेशन सायकलवारीचे नियोजन असतेच.नाशिकमधील रहिवासी असल्याने पवित्र गोदावरीगंगेची परिक्रमा करण्याचा मानस या सायकलिस्टनी व्यक्त केला आहे.त्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे.
सायकल प्रवासात चांगले अनुभव येतात.सामाजिक समरसतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचतो.शरीर तंदुरुस्त राहाते.
आदर फौंडेशनच्यावतीने यावर्षी नाशिक परिसरात १हजार ६०० वृक्षारोपण करण्यात आले.वेळीच प्राणवायू मिळाला नसल्यामुळे अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.या घटना लक्षात घेता.शुद्ध प्राणवायू देणाऱ्या भारतीय वृक्षांचेच रोपण करण्यात आल्याचे या सायकलिस्ट ग्रुपने सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!