‘कोरोना पॉझिटीव्ह’ केले ‘बाथरुमा’त क्वारनटाईन


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
America –
विमानामध्येच प्रवासात एक महिला ‘कोरोना पॉझिटीव्ह’ आल्याने त्या महिलेस थेट विमानाच्या  ‘बाथरुमा’त क्वारनटाईन केल्याची घटना समोर आली आहे. ती महिला विमानाने शिकागोमधून आइसलँड येथे जात होती.

जगात कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यामुळे या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र काही दिवसांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन याने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दरम्यान एक अमेरिकेची महिला एका फ्लाइटमध्ये कोरोना पॉझिटीव्ह सापडली.त्यामुळे तीन तासांसाठी त्या महिलेला एका फ्लाईटमधील बाथरुममध्येच क्वारंटाईन करण्यात आले. काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार, ही महिला फ्लाईटमधून शिकागोमधून आइसलँडमध्ये जात होती. १९ डिसेंबरला विमान प्रवासादरम्यान, रस्त्यामध्येच गळ्याचा त्रास व्हायला लागला.त्यानंतर त्या महिलेने फ्लाइटच्या बाथरुममध्ये जाऊन रेपिड कोविड टेस्ट केली. ज्यामध्ये तिची टेस्ट ही पॉझिटिव्ह आली.
मात्र या महिलेने प्रवासादरम्यान कोरोना टेस्ट केल्या होत्या.ज्यात पहिल्या दोन पीसीआर टेस्ट आणि जवळजवळ पाच रॅपिड कोविड टेस्ट केल्या. या सर्व कोविड-१९ टेस्टचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. मात्र, फ्लाइटमध्ये बसल्यानंतर बरोबर दीड तासाने या महिलेला गळ्यात खवखव जाणवू लागली. महत्त्वाची बाब म्हणजे ही महिला वॅक्सीनेटेड असून, बूस्टर डोससुद्धा लावला होता.तिने या अगोदर अनेकवेळा कोविडची टेस्ट केली आहे.कारण तिच्यासोबत काम करणाऱ्यांनी अजूनही कोविड टेस्ट केलेली नाही.विमान उतरवल्यानंतर या महिलेला विमानातून अगदी शेवटी उतरण्यास सांगितले.तिला एअरपोर्टवर पुन्हा टेस्ट करायला सांगितले. तिथेही तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या महिलेला १० दिवसांसाठी एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!