कोपरगाव तालुक्यात लाखाचा गांजा जप्त ; नगर एलसीबी टिम’ची कारवाई

कोपरगाव तालुक्यात लाखाचा गांजा जप्त ; नगर एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोपरगाव: विक्रीस आणलेल्या गांजासह, कोपरगांव येथे आरोपीला पकडण्याची कारवाई नगर एलसीबी टिम’ने केली आहे. प्रदीप बाजीराव पायमोडे (वय 32, रा. मंजुर, ता. कोपरगांव) असं पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात व अंमलदार बाळासाहेब मुळीक, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, उमाकांत गावडे व मपोकॉ प्रियंका चेमटे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
एलसीबी टिम’ कोपरगांव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि हेमंत थोरात यांना दि.३१ मार्च २०२४ रोजी प्रदीप बाजीराव पायमोडे ( रा. मंजुर, ता. कोपरगांव) हा कब्जात गांजा बाळगून त्याच्या राहत्या घरी विक्री करतो अशी माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात जाऊन पोनि संदीप कोळी व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेऊन छाप्याचे नियोजन केले.
एलसीबी टिम’ने माहिती ठिकाणी मंजुर (ता. कोपरगांव) येथे जाऊन संशयीत प्रदीप पायमोडे याचे वास्तव्याबाबत माहिती घेऊन, त्याच्या राहत्या घरासमोर जाऊन खात्री करता घरात एकजण लोखंडी कॉटवर बसलेला दिसला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदीप बाजीराव पायमोडे (वय 32, रा. मंजुर, ता. कोपरगांव) असे असल्याचे सांगितले. त्याचे घराची पंचा समक्ष झडती घेता त्याचे घरातील कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळुन आला. पथकाने पिवळ्या रंगाच्या गोणीत मिळून आलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला याबाबत विचारणा करता त्याने पिवळ्य रंगाच्या गोणीत बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा असुन विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने आरोपी प्रदीप बाजीराव पायमोडे (वय 32, रा. मंजुर, ता. कोपरगांव) याच्या घरातील लोखंडी कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत ठेवलेला १ लाख ६ हजार १५० रुपये किंमतीचा १० किलो ७३२ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आल्याने तो हस्तगत करण्यात आला. याबाबत आरोपीविरुध्द एलसीबीचे पोकाॅ बाळासाहेब अशोक गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११५/२०२४ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८(क), २० (ब) ii प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगांव पोलिस हे करीत आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!