संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : १०० गुन्हेगार सुटले तरी चालेल,पण एका निरापराध व्यक्तीला शिक्षा नको, या उक्तीचा प्रत्यय सोमवारी (दि.२४ एप्रिल)ला कोतवाली पोलिसांच्या सुसंवाद कार्यपद्धतीतून समोर आला. या विशेष कामाबद्दल कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्यासह गुन्हे शोध टिम’चे अनेकांनी कौतुक केले खरे, पण पोलिसांबाबतच्या सामाजिक दृष्टीकोनातून पाहाणीची संशाकता बदलण्यास मदत होईल…

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोतवाली पोलिसांकडे ‘एसी चोरी’ प्रकरणी आलेल्या तक्रारीची पोनि चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ दखल घेतली. ‘गुन्हे शोध टिम’ ला तपास लावून गुन्हेगारांना पकडण्याच्या सूचना दिल्या. कोतवाली गुन्हे शोध टिम’ने तपासास प्रारंभ केला. या दरम्यान एसी चोरी प्रकरणी आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार केडगाव परिसरातून त्या संबंधित चोरट्यास पकडण्यात आले. परंतु त्याने ज्याचा या घटनेशी कुठेही संबंध नसताना केवळ पकडण्यात आलेल्या बहाद्दर चोरट्याने नावे सांगितल्याने, त्या गोरगरीब संबंधिताला त्याच्या राहात्या ठिकाणाहून कोतवाली गुन्हे शोध टिम’ने त्याला पकडले. यानंतर ज्याचा त्या घडलेल्या घटनेशी संबंध नसणा-याच्या पत्नीने हा सर्व झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या संबंधित नातेवाईकांना दिली. तसेच तत्पूर्वी घटनेशी संबंध नसणा-याच्या पत्नीने या घटनेशी माझ्या पतीचा काहीही संबंध नाही. आम्ही कामे करुन पोट भरतो, असे पोलिसांनाही सांगितली. पण तिच्या सांगण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. यानंतर संबंधिताचे नातेवाईकांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून वास्तव माहिती दिली. यानंतर कोतवाली पोलिसांनी आपला तिसरा डोळा उघडून ज्याने संबंध नसणा-याचे नाव सांगितले, त्याची पडताळणी चांगलीच केली, यात त्याने त्याचा सहभाग नसून, मी मुद्दाम नाव घेतल्याचा खुलासा झाला. यामुळे कोतवाली पोलिसांच्या हातातून पाप होण्यापासून अथवा शिक्षा होण्यापासून थांबली. यामुळे कारण नसताना तो संबंधित आरोपी होण्यापासून वाचला. यामुळे एक निरापराध हा करणं नसताना चोरीच्या गुन्ह्यात अडकला असता, त्याचे कुटुंबीय रस्त्यावर येऊन लहान मुलांची दैना झाली असती. या पापाचे धनी कोतवाली पोलिस झाले असते. पण एका निरापराध्याला सोडविण्यासाठी कोतवाली गुन्हे शोध पथकाने केलेली कामगिरी ही कौतुकास्पद आहे. या घटनेमुळे पोलिसांकडे समाजात पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास व पोलिसांबद्दलची विश्वार्हता निर्माण होण्यास मदतच होईल.
या घटनेत केवळ पोलिसांनी पकडलेल्याने नाव घेतले, म्हणून एक निरापराध गुन्हेगार होतात केवळ कोतवाली गुन्हे शोध टिम’ने स्वच्छ मनाने केलेल्या तपासात निष्पन्न झाला. एकंदरीत एक प्रकारे १०० गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निरापराधास शिक्षा नको, या उक्तीला कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव व त्यांची गुन्हे शोध टिम’ सार्थ ठरली आहे.
📥पोलिस दादा देव…
अपराधी नसताना आरोपी म्हणून पोलिसांनी आपल्या पतीस उचलून नेले, या अन्यायामुळे त्या संबंधिताची पत्नी हातबल झाली होती. परंतु यानंतर पोलिसांनी फेरचौकशी केली, त्यात तो संबंधित घटनेत नसल्याने पोलिसांनी संबंधितास सोडले. यानंतर संबंधितांच्या पत्नीसह मुलांच्या चेहरे फुलले परंतु पोलिस दादा देव, असल्याची प्रतिक्रिया दिली.. 📤