कोतवाली पोलीस ठाणे: कारमधून गुटखा वाहतूक करणा-यांना पोलीसांनी पकडले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: शहरातील हातमपुरा ते कोठीचौक या रस्त्याने बंदी असलेला गुटखा व तंबाखू वाहतूक करताना ईको गाडी पकडली. यात तब्बल ३ लाखांचा मुद्देमाल कोतवाली पोलिसांनी पकडला.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध टिमचे पोसई मनोज कचरे, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रिवाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोना सलीम शेख, पोकाॅ अभय कदम, पोकाॅ संदिप थोरात, पोकाॅ अमोल गाई, पोकॉ सुजय हिवाळे, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकाॅ अतुल काजळे, पोकाॅ सोमनाथ राऊत, पोकॉ सागर मिसाळ, पोकाॅ गणेश ढोबळे आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.९ मार्च २०२३ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलीसांना माहिती मिळाली की, महाराष्ट्र राज्यांत प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू हे अहमदनगर शहरातील हातमपुरा ते कोठीचौक या रोडने एक चारचाकी ईंको गाडीमध्ये गुटखा व तंबाखू हे वाहतूक होणार आहे. आता सापळा लावल्यास ती मिळून येईल. या माहितीनुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. नि. चंद्रशेखर यादव यांच्या आदेशाने कोतवाली गुन्हे शोध टिम’चे पोसई मनोज कचरे व अंमलदार यांनी हातमपुरा ते कोठी जाणारे रोडवरील दर्ग्यासमोर सापळा लावला. या दरम्यान ईको गाडी येतांना दिसली असता तिला थांबविले. त्या गाडीची झडती घेतली असता गाडीच्या मागील शिटामध्ये दोन पांढ-या रंगाच्या गोण्या दिसून आल्या. तसेच गाडीतील त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अस्लम गुलाब शेख (वय ३२, रा. पारनेर जि अहमदनगर), साजिद कदीर खान (वय ३४ रा सुपा ता पारनेर जि अहमदनगर), रणजित नवनाथ परदेशी (वय ३६) असे असल्याचे सांगितले. त्यांचे कब्जात एकूण मिळालेला माल याप्रमाणे ७०४०/- रु किचे २ पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये केसरयुक्त विमल पानमसाला २२ पॅकेट, ९६८-रु.किंचा २ पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये व्ही-१ तंबाखुचे एकुन २२ पॅकेट, ३ लाख रु किंची एक मारुती सुझुकी कंची सिल्वर रंगाची इको गाडी (एमएच ३ बीई ४५४३) असा एकूण ३ लाख ८०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुनं २४४ / २०२३ भादवि कलम ३२८,२७२,२७३,१८८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!