संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : माळीवाडा परिसरात धारदार सुरा हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्यास कोतवाली पोलीसांनी अटक केले आहे. वैभव अनिल घोरपडे (वय १९, रा. बुरुडगल्ली, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. हत्यार कायद्यान्वये दोन महिन्यात कोतवाली पोलिसांची पाचवी कारवाई आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सुचनेनुसार सपोनि रवींद्र पिंगळे, पोकाॅ योगेश भिंगारदिवे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाट, संदीप थोरात, तन्वीर शेख, अमोल गाडे, नितीन शिंदे, अशोक भांड, नितीन धायगुडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी ( दि.३० एप्रिल) रात्री कोतवाली पोलीसांना माहिती मिळाली की, माळीवाडा वेशीजवळील लक्ष्मीआई मंदीराजवळ एकजण त्याच्या हातात धारदार सुरा घेऊन लोकांमध्ये मोठमोठ्याने आरडाओरड करुन दहशत निर्माण करत आहे. या माहितीनुसार कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध टिम’ला तात्काळ संबंधित ठिकाणी रवाना केले. तेथे एकजण त्याच्या हातात धारदार सुरा घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत असल्याचे निदर्शनास आले. कोतवाली गुन्हे शोध टिम’ने त्यास शितीफिने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील लोखंडी धारदार सुरा जप्त केला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव वैभव अनिल घोरपडे (वय १९ वर्ष रा. बुरुडगल्ली, अहमदनगर) असे सांगितले. त्याला ताब्यात घेतले व त्याच्याविरुध्द पोकॉ सुजय हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं ४१९/ २०२३ भारतीय शस्त्र अधिनियम ४/२५ सह क्रिमीनल लॉ अमेंटमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोनि चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोना नितीन शिंदे हे करत आहेत. घोरपडे इसमासोबत दारू पिऊन मारहाण करणारे प्रसाद दिलीप भापकर (वय २३) आणि अमोल दिलीप भापकर( वय २६, दोन्ही रा. माळीवाडा पारिजात हॉटेलमागे अहमदनगर) यांच्यावर सुद्धा मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
मागील दोन महिन्यात कोतवाली पोलिसांकडून हत्यार बाळगणे व वापर करणाऱ्यांवर एकूण पाच कारवाया करण्यात आलेल्या आहेत.