संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील व्यावसायिकला मारहाण करणाऱ्यांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. अरबाज शकील सय्यद, गिरीश सुनील वरकड अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोउपनि सुखदेव दुर्गे, मनोज महाजन, पोकाॅ तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, इनामदार, अमोल गाडे, संदीप थोरात, गणेश धोत्रे, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, योगेश खामकर, सतीश भांड आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.५ एप्रिलला ३.४५ वाजण्याच्या सुमारास अर्बन बँक चौक, माणिक चौकाजवळ (अहमदनगर) येथे साक्षीदार सर्वेश बार्शीकर हा त्याच्या दुकानातून घरपट्टीची पावती आणण्यासाठी जुनी मनपा कार्यालय येथे जाण्यासाठी दुचाकीवर निघाला. या दरम्यान त्याच्या पाठीमागून आरोपी अरबाज शकील सय्यद व गिरीश सुनील वरकड हे त्यांच्या दुचाकीवर येऊन त्यांनी साक्षीदार सर्वेश बार्शीकर
यांना पाठीमागून हॉर्न दिला. तेव्हा साक्षीदार सर्वेश बार्शीकर यांनी त्यांच्याकडे पाहिले, यावेळी त्यांनी साक्षीदार सर्वेश यांना अरेरावी करून शिवीगाळ केली. थोड्याच वेळात आरोपी दोघांनी त्यांच्या मदतीला त्यांचे दोन साथीदार घेऊन येऊन यातील साक्षीदार सर्वेश यांना त्यांचे हातातील रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या दुकानात काम करणारे साक्षीदार दिनेश फुले व हमाल राजपूत ही साक्षीदार सर्वेश यांना सोडविण्यासाठी आले असता आरोपी अरबाज शकील सय्यद याने साक्षीदार राजपूत यांच्या हातातील लाकडी फळी व हातातील कातर हिसकावून घेऊन त्याने साक्षीदार सर्वेशसह मला यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यात कात्रीने व लाकडी फळीने मारहाण केली. त्यांचे इतर साथीदारांनी साक्षीदार सर्वेश यांना व मला रॉडने दगडांनी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, या स्वरूप गोपाळदास बार्शीकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा र.नं व कलम : 325/2023 भादवी कलम , 307,324,,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.