संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : रात्री वेळी प्रवाशांना लुटणारे दोघे पकडण्यात कोतवाली गुन्हे शोध टिमला यश आले आहे. पोलिसांनी पकण्यात आलेल्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्याना न्यायालयाने २ दिवसांची पोलस कोठडी सुनावली आहे.
मोईन बादशहा शेख शेख (वय-२२, रा बड़ी मशिदसमोर, मुकुंदनगर जि अहमदनगर), शाहरुख आलम शेख (वय२७, रा नागरदेवळे ता नगर अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोसई मनोज कचरे, पोहेकॉ शरद गायकवाड, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना अब्दुलकादर इनामदार, पोना योगेश खामकर, पोकॉ संदिप थोरात, पोकॉ अमोल गाढे, पोकॉ सुजय हिवाळे, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकाॅ सागर मिसाळ आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
![](http://sangramsattacha.com/wp-content/uploads/2023/03/20230301_132043-3.gif)