
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : कोयत्याने जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगारास पकडण्याची कारवाई कोतवाली पोलीसांनी केली आहे. संग्राम रमेश गिते असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खरै, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि रविद्र पिंगळे, पोहेकॉ सतिष भांड, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ आदिंच्या टिमने ही कारवाई केली.

दि. २३ जानेवारी २०२३ रोजी रात्री १.३० वाजण्याचे सुमारास त्यांचेकडील मोपेड गाडीवरुन केडगांव अयोध्यानगर येथे त्याच मित्राकडे भेटण्यासाठी जात असतांना अयोध्यानगर मराठी शाळेच्याजवळ रस्त्यावर संग्राम गिते (रा.रमाजीनगर, केडगांव अहमदनगर) याने त्यांच्या समोरुन येऊन थांबवून तू सातपुतेच्या पोरांमध्ये का राहतो काय ? तुझी लायकी आहे का, तुला मारूनच टाकतो, असे म्हणून त्याचे कंबरेला लावलेल्या कोयत्याने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने हातावर मारहाण करून जखमी केले आहे, या विशाल मच्छिद्र शिरवाळे (रा. काटवनखंडोबा अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं । ७३ /२०२३ भादवि कलम ३०७,३२४, ५०६, सह आर्म ॲक्ट ४/२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.