
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : तलवार, कोयते, गुप्ती बाळगल्याप्रकरणी दोघांना कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. कुणालसिंग कमल सिंग जुन्नी (वय १९, रा काटवनखंडोबा अहमदनगर), अर्शद रशिद शेख (वय २२, रा. इमामवाडा, नविन टिळकरोड अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि रविंद्र पिंगळे, पोलीस अंमलदार सतिष भांड, दिपक बोरुडे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, अतुल काजळे, सुजय हिवाले, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, शरद धायगुडे, कावेरी फुगारे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २२ मार्च २०२३ रोजी कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, अहमदनगर शहरातील काटवन खंडोबा कमानीजवळ टिळकरोड लगत कुणालसिंग कमल सिंग जुन्नी नावाचा हा अवैध हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगून विक्री करत आहे. आत्ता गेल्यास तो मिळून येईल. ही माहिती पोनि चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांना त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी जाऊन माहितीतील त्या संबंधितास जागीच पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुणालसिंग कमल सिंग जुन्नी असे सांगितले. यावेळी त्याच्याकडे दोन तलवारी, एक कोयता. एक सत्तुर अशी हत्यारे मिळून आली आहेत. मिळून आलेल्या हत्यार, शस्त्र हे त्यास कोठून तसेच कोणत्या कामासाठी आणलेले आहेत. याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता हत्यारे माझीच असून त्यापैकी एक मोठा कोयता व एक चाकू हा अर्शद रशिद शेख याचा असल्याचे कबुल केले. याबाबत पोना सलीम शेख यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं. २७८/२०२३ आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोना महेश बोरुडे हे करत आहेत.