संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील बुथ हॉस्पिटल परिसर गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणा-यास कोतवाली पोलिसांनी पकडले. दत्तात्रय शामराव काळे (वय ४१, रा लोखंडी फॉलजवळ, नेवासा ते श्रीरामपुर जाणारारोड, बेलपिंपळगांव ता नेवासा जि अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोसई मनोज कचरे, पोसई गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे, सतिष शिंदे आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.४ जून २०२३ रात्री कोतवाली पोलीसांना माहिती मिळाली की, अहमदनगर शहरातील बुथ हॉस्पीटल परिसर येथे एकाच्या कंबरेला गावठी पिस्तोल लावलेले आहे. तो तेथे संशयितरित्या उभा आहे. आत्ता गेल्यास मिळून येईल अशी माहिती मिळाल्याने पोनि चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्यास सांगितले. त्या ठिकाणी जाऊन खात्री करता तेथे एकजण संशयितरित्या फिरतांना दिसला. त्याची पोलीस अंमलदारांनी खात्री करुन त्यास सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला उजव्या बाजुला एक काळया रंगाचे लोखंडी अग्नीशस्त्र (गावठी पिस्तोल) व त्याचे मॅग्झीनमध्ये तीन जिवंत काडतुसे असे एकुन ३२ हजार १०० रु किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव दत्तात्रय शामराव काळे (रा लोखंडी फॉलजवळ, नेवासा ते श्रीरामपुर जाणारारोड, बेलपिंपळगांव ता नेवासा जि अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.
पोकॉ संदिप हेमंत थोरात यांच्या फिर्यादीवरुन आरोपी दत्तात्रय काळे याच्याविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनंबर ५८६ / २०२३ शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोसई गजेंद्र इंगळे हे करीत आहे.