संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : डॉ. पंडीत यांच्या बंगल्याचे नविन ए.सी. चोरणाऱ्यास पकडले. चोरट्याकडून १ लाख २० हजार रु. चा मुददेमाल हस्तगत करण्याची कारवाई कोतवाली पोलीसांनी केली.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोसई मनोज कचरे, पोलीस अंमलदार देवराम ढगे, तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.५ एप्रिल २०२३ रोजी शहरातील डॉ. राहुल नामदेव पंडीत यांच्या नविन घराचे साईनगर भोसले आखाडा, बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे बांधकाम चालू आहे त्यांनी घरात बसविण्याकरीता च्यु स्टार कंपनीचे एकूण ५ ए.सी. बंगल्यात आणून ठेवले होते. त्यापैकी दोन ए.सी. हे अज्ञात चोरटयांने ते चोरून नेले. या डॉ. पंडीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दि. २२ एप्रिल २०२३ रोजी गु क्र. ३५८/२०२३ भाविक ३८० प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा कोतवाली पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध टिम’ने तपास लावून वास्तव चोरट्यास पकडले.