संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – अखेर एका सामाजिक कार्यकर्तेने काही दिवसांपूर्वी सोशलमिडियाच्या माध्यमातून नगर शहरातील लाईव्ह बेकायदेशीर धंदे दाखविण्यात आले होते,याचीच दखल घेतली काय?, म्हणून कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत एकाच दिवशी ४ जुगार अड्ड्यावर छापे टाकून ४ आरोपींना अटक करीत, ८ हजार ७९ रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकॉ बाबासाहेब तागड, पोना गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोकाॅ दिपक रोहकले, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ अतुल काजळे, पोकॉ तानाजी पवार, पोकॉ सुजय हिवाळे, पोकॉ अमोल गाडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत अहमदनगर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एएमटी बसस्थानकाजवळ, शहरातील पुणे स्वस्तिक बसस्थानकाच्या शेजारी स्वास्तिक चौकात, शहरातील बुरुडगाव रोड येथील चाणक्य चौकात सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ, वाशिंगसेंटरजवळ सारसनगररोड, शहरातील महात्मा फुले चौक मार्केटयार्ड येथील भितीच्या आडोशाला लोकांकडून पैसे घेऊन त्यांना आकडयाच्या चिठया देऊन कल्याण मटका नावाचा हारजितीचा जुगार खेळवीतो आहे, या चार ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि संपतराव शिंदे यांना मिळाली होती. पोनि श्री शिंदे यांनी पोलिस पथकाला सूचना दिल्या. पथकाने ७ मे २०२२ रोजी २. ४५ वा. छापा टाकला. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एएमटी बसस्थानकाजवळ भितीच्या आडोशाला छापा टाकला. या छाप्यामध्ये आरोपी दिलीप गोरख टेमकर (वय २९, रा घोडेगाव दिपक हॉटेलजवळ ता नेवासा जि.अ नगर) त्याचे कब्ज़ात कल्याण मटक्याची रोख रक्कम ७४० रु, ३. ३० वाजता महात्मा फुले चौक मार्केडयार्ड मागील गेटसमोर वॉशींग सेंटरजवळ सारसनगररोड भितीच्या आडोशाला आरोपी नवनाथ महादेव नागरगोजे (वय ३१, रा ता पाथर्डी चिंचपुर पांगुळ गाव ता पाथड़ी जि अ नगर ह.रा. सारसनगर चिपाडेमळा शहाने वकील यांचे जवळ अहमदनगर) असे त्याची अंगझडती घेतली असता १ हजार १७० रु रोख रक्कम मिळून आली, आणि १ ४५ वा बुरुडगाव रोड चाणक्य चौकात सार्वजनिक स्वछतागहजवळ भितीच्या आडोशाला आरोपी निलेश जनार्धन जरबंडी (वय ३० रा नालेगाव दातरंगे मळा नालेगाव अहमदनगर) त्याच्या कब्जातून ७१० रु रोख रक्कम मिळाली.