कोतवाली पोलिसांची माणुसकी… काय आहे कामगिरी..!
‘पोनि दराडेंसह टिम’ तत्परतेमुळे तपास : गुन्ह्यातील मूळ आरोपी शोधण्यास यश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : माहिती मिळाताच, शोध मोहीम राबवून मयत अभ्रकाच्या नातेवाईकांचा शोध मोहीम राबवून वास्तव घटनेपर्यंत तपास केला. यामुळे वास्तव माहिती समोर आल्याने मूळ आरोपीला पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आलेच, पण यात पोलिसांतील माणुसकीचं दर्शन घडले.. काय आहे हे प्रकरण तर ते असे…
शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नगर कोतवाली पोलीस ठाण्यात नगर शहरातील अमरधाम,नालेगाव येथील वॉचमन याने येऊन नगर शहर डिवायएसपी अमोल भारती व कोतवालीचे पोनि प्रताप दराडे यांना माहिती दिली की, नालेगाव अमरधामाच्या एका खोलीत नवजात मृत अभ्रक कोणीतरी ठेवून गेले आहे. या माहितीनुसार घटनास्थळी म्हणजे नालेगाव अमरधाम नालेगाव या ठिकाणी नगर शहर डिवायएसपी अमोल भारती, पोनि प्रताप दराडे, परि. पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, सफौ गिरीषकुमार केदार यांनी भेट दिली. त्या ठिकाणी पाहणी करुन डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि श्री दराडे यांनी गुन्हे शोधच्या तीन टिम तयार करुन त्या टिम’ला मृत नवजात बालकाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर दोन तासात ‘कोतवाली गुन्हे शोध टिम’चे पोकाॅ सुरज कदम व पोकाॅ सुजय हिवाळे यांनी नगर जिल्हा रुग्णालय येथे मृत अभ्रकाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. या दरम्यान त्यांनी याबाबत पोनि प्रताप दराडे यांना माहिती दिली.
पोनि श्री दराडे यांनी मृत अभ्रकाचे वडील रेवन्ना सुखदेव शिंदे व नातेवाईक यांच्याकडे विचारपूस केली असता माहिती समजली की, अभ्रक हे जिल्हा रुग्णालयात जन्म घेण्यापूवीच मयत झाले होते. म्हणून त्यास दफन करण्यासाठी त्यांच्या नातेवाईक यांनी नालेगाव अमरधाम येथे घेऊन गेले. यावेळी तेथे त्यांना अनोळखी एकजण भेटला. त्याने त्या नातेवाईकांना सांगितले की, मी त्या ठिकाणी दफनविधी करत असतो. त्यानंतर त्यांची पत्नी आयसीयुमध्ये ॲडमिट करावयाचे असल्याने त्यांनी त्यावर विश्वास ठेवून अभ्रक हे त्या अनोळखीकडे विधीवत अंत्यविधीसाठी देऊन निघून गेले. या सर्व घटनेची पडताळणी करुन पोनि श्री दराडे सखोल तपास करुन वास्तव माहिती समोर आल्यावर मयत अभ्रकाच्या आई, वडील व नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला नाही.परंतु मूळ अनोळखी आरोपीचा शोध घेण्या करीता पोनि श्री दराडे यांनी गुन्हे शोध टिम रवाना केली.
नगर कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं ८७७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०१ प्रमाणे दाखल करुन पुढील तपास परि. पोसई सेदवाड यांना देण्यात आला आहे. मुळ आरोपीत अर्जुन मुथ्थु स्वामी यास गुन्हे शोध पथकातील पोहेकाॅ विशाल दळवी, पोना सलिम शेख, पोकाॅ अतुल काजळे यांनी शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
कुटुंब हे अतिशय गरीब परिस्थितीत असल्याने पोनि प्रताप दराडे व परि. पोसई कृष्णकुमार सेदवाड व सफौ. गिरीषकुमार केदार यांनी मृत अभ्रकाचा विधीवत अंत्यविधी त्यांच्या नातेवाईकासमवेत केला. अंत्यविधी करण्याची परीस्थिती नसणा-या कुटुंबाला कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे, परि. पोउनि सेदवाड यांनी पोलीसातील देवमाणूस दाखवून दिले. तसेच पो.नि. प्रताप दराडे यांनी प्रसंगावधान राखुन चुकीच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल न होता परि. पोउनि सेदवाड यांनी योग्य चौकशी करुन घेऊन मूळ आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन तसेच कुटुंबाला त्यांच्या बालकाचे विधीवत अंत्यविधी करुन एका सर्वसामान्य कुटुंबाला पोलीसातील देवमाणूस दिसला आहे.