संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील कोतवाली व तोफखाना ही दोन्ही पोलिस ठाणे हद्दीत नेहमीच काय घडले ! नेमकं सांगण अवघड. असो, पण नव्याने दाखल झालेले कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांना कोतवाली पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमधील गट-तटांचे राजकारण संपुष्टात आणवे लागेल. वास्तविक येथील गुन्हे शाखा (डिबी) पूर्णतः नव्याने चांगल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली पाहिजे. यानंतरच ख-या अर्थाने कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था नोंदण्यास प्रारंभ होईल. तसं कोतवाली पोलिस ठाण्यात आलेल्या आत्तापर्यंत पोलिस अधिकाऱ्यांना येथील कारभार समजून घेण्यासाठी खूप कालावधीत गेला.
हे केवळ येथे कर्मचाऱ्यांचे असणा-या गटातटाच्या राजकारणामुळे ! येथे जर बारकाईने लक्ष केंद्रित केल्यास राजकीय गुन्हेगारांवर तसेच पोलिस ठाणे हद्दीत चारही बाजूंनी अवैध धंद्यांवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे केवळ कोतवालीतील काही अपवाद पोलिस कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधामुळे झाले. त्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल. तरच येथील हद्दीतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ‘सिंघम’च्या भुमिकेत उतरता येईल.
तर दुसरीकडे तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि मधुकर साळवे यांना सर्वात प्रथम मालकी हक्क नसताना कोणाच्या जागा, घरावर ताबा मारण्याचा प्रकारातील गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, अशा पद्धतीने कारवाई करावी लागेल. यात ‘जागा ताबा’ ही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपल्याला विश्वासू पोलिस कर्मचारी सहकार्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तोफखाना गुन्हे शाखा (डिबी) नव्याने आलेल्या अधिका-यांना संधी दिल्यास त्याचा फायदा तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होईलच.. परंतु तोफखाना पोलिस ठाणे हद्दीतील अनेक अंधारात सुरू असणारे उद्योग समोर येण्यास वेळ लागणार नाही. या परिसरात अवैध धंदे भरचौकात सुरू आहेत. याला कुठे तरी आळा बसेल. चैन स्नॅचिंग, जागा ताबा यासह वाढत्या गुन्हेगारीवर तसेच त्याबरोबरच वाढते अवैध धंदेवाल्यावर वचक निर्माण होईल. त्या दृष्टीने विश्वासू पोलिस कर्मचाऱ्यांची टिम नेहमीच कार्यरत ठेवावी लागेल, तरच तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त ठरेल..