कृषीभूषण विठ्ठलदास आसावा यांना अमेरिकन मेरीट कौन्सिलची मानद डॉक्टरेट प्रदान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
आश्वी : अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलदास बालकिसन आसावा यांना कृषी व पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान बद्दल युनायटेड स्टेट अमेरिकन मेरीट कौन्सिलची मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाली असून या परीषदेचे शैक्षणिक संचालक डॉ.हसिना यांनी अमेरिका स्थित न्यु जर्सी येथून प्रसिद्ध केलेल्या कार्यालयीन पत्रकात विठ्ठलदास आसावा यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत शेती व पर्यावरण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रभाव व समर्पणाबाबत उत्कृष्ट कार्याची दखल घेत आसावा याची कामगिरी अपवादात्मक असल्याचे प्रतिपादन केले आहे.
युनायटेड संशोधन परिषदेद्वारा मान्यताप्राप्त अमेरीकन संशोधन परीषद प्रमुख डॉ.मुसा ओटिनो ओबाटै आणि परीषद रजिस्ट्रार डॉ.शारोन कॅम्बैंल फिलीप्स यांनी संयुक्तरीत्या कृषी व पर्यावरण क्षेत्रातील मानद डॉक्टरेट प्रमाणपत्र विठ्ठलदास आसावा यांना जारी केले.श्री.असावा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.