किशोर कटोरे यांना राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक भूषण पुरस्कार जाहीर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार येथील मा.भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष व औदुंबर नागरी सहकारी पतसंस्थेचे jordan 5 wmns air 1 mid nike air max womens jordan 5 air jordan 14 nike air force jordan max white shoes air jordan retro 1 mid casual shoes jordan 5 cheap cheap jordans nike air max 97 gucci air jordan 4 retro military black nike vapor max air jordan 14 cheap cheap jordans संचालक तथा भिंगार शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे किशोर कटोरे यांना लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार हा श्री कटोरे यांना मुंबई देवनार विभाग चेंबूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय डहाके, लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे या मान्यवरांच्या हस्ते भिंगार येथील कार्यक्रमात देण्यात आला.
किशोर कटोरे यांनी अनेक समाज उपयोगी कामे करीत समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम केले आहेत. शासनाच्या सर्व योजना आयुष्यमान भारत कार्ड, स्वनिधी योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, ई- श्रम कार्ड असा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.
यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अध्यक्षा सौ सुनंदा अष्टगी, सुकानू समिती सदस्य रामचंद्र बिडवे, महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष सचिन ढोपरे यांच्यासह व्यवस्थापक मार्गदर्शक समिती प्रा. शितल वांढरे, संदीप सोनसळे, सुनील कानडे, सीमा वाळुंजकर, श्याम पारेकर, स्वाती सोनसळे, सात्विक बिडवे, सुधीर कडते, मयुरी ढोले, दिपाली पैठणकर आदि उपस्थित होते.
श्री कटोरे यांना राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना विविध सामाजिक, राजकीय व्यक्ती, संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.