सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील वडगांव व ढाकनवाडी (ता.पाथर्डी) येथील राष्ट्रीय जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजुर झालेले आहे. या संबंधित कामाच्या अंदाजपत्रकात ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने कामापेक्षा जास्त रकमेचे केलेले आहे. यामुळे या संबंधित पाणी पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता होण्याची शक्यता आहे, तसेच ही योजना अहमदनगर जिल्हा हद्द ओलांडून बीड जिल्हा हद्दीत राबविली जात आहे, या तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही अहमदनगर जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे केलेल्या तक्रारीत भाजपचे स्थानिक बूथ प्रमुख रावसाहेब उत्तमराव ढाकणे यांनी दिला आहे.
राष्ट्रीय जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रका प्रमाणे पाईपलाईनचे खोदकाम झालेले नाही. तसेच खोदकाम करतांना काही ठिकाणी फक्त दोन फुट काम केलेले आहे.
ही योजना जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभाग तसेच ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग पंचायत समिती पाथर्डी यांच्या मार्फत राबविण्यात येत असून वडगांव हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये असून योजनेचे काही काम मात्र बीड जिल्हा हद्दीतील वस्तीवर केले जात आहे. तर जेथे गरज आहे त्याठिकाणी मात्र स्थानिक राजकारण आडवे येत असुन गावच्या अहमदनगर जिल्हा हदीतील काही वस्त्या या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत.या वस्त्यांना योजनेमध्ये समाविष्ट करून ,या योजनेमध्ये झालेल्या अपहाराची व अनियमिततेची चौकशी होवुन दोषींवर कारवाई करण्यात यावी.याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
असे रावसाहेब उत्तमराव ढाकणे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सदर योजनेचे पुढे काय होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.