कामरगावाजवळ खून, दोघे अटक ; कोतवाली,नगर तालुका पोलिसांची कारवाई

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
नगर तालुक्यातील कामरगाव नजिकच्या फाळके फार्महाऊससमोरील डोंगर परिसरात एकाच खून झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) समोर आली आहे. दोघांना कोतवाली पोलिस व नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील मयताचे नाव राहुल मोरे असे आहे. हनुमंत नरसू गायकवाड याला व सूरज मोरे यास बाबुर्डी घुमट येथून पोलीसांनी अटक केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, बुधवार (दि.१३) सकाळी हनुमंत नरसू गायकवाड हा अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला होता. त्याने कोतवाली पोलिसांना झालेल्या घटनेबाबत सांगितले. परंतु घटना ही नगर तालुका हद्दीत असल्याने, याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना कोतवाली पोलिसांनी माहिती दिली. या घटनेची खाञी करण्यासाठी घटनास्थळी कोतवाली व नगर तालुका पोलिस हे हनुमंत नरसू गायकवाड याला घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर मयताची माहिती घेत, दुसरा आरोपी सूरज लक्ष्मण मोरे याला बाबुर्डी घुमट येथून अटक करण्यात आली आहे. हा खून कोणत्या कारणास्तव झाला, याबाबत पुढील तपास नगर तालुका पोलिस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!