व्यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – स्वातंत्र्यांच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देत आगामी कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार्या घटनांना आणि स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच थोर स्वातंत्र्य सेनानींच्या तत्कालीन क्रांतीकारक घटनांना उजाळ देत, देशप्रेमाची-देशभक्तीची ज्योत पुन्हा एकदा काँग्रेसजणांमध्ये आणि तमाम जनतेमध्ये रुजविण्याचा प्रयत्न म्हणजे ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपक्रम होय. राज्यात 9 ऑगस्ट 2021 क्रांतीदिनापासून हा कार्यक्रम सुरु झाला असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा साजरा होत आहे. या निमित्ताने अहमदनगर शहर काँग्रेस कमिटी आणि भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्यांनी माजी शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोंबरला पदयात्रा काढण्यात आली.
अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात पदयात्रा करत कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजींना आदरांजली वाहिली. म.गांधी यांचे छायाचित्र सोबत मशाल ज्योत मिरवत ही पदयात्रा भुईकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून मिरवत पुन्हा प्रवेशद्वार अशी होती. यावेळी माजी शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, महिलाध्यक्षा मार्गारेट जाधव, रजनी ताठे, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, अनिल परदेशी, शशिकांत पवार, अनिल वर्हाडे, अजहर शेख, संतोष कांबळे, संतोष धीवर, ॲड.नरेंद्र भिंगारदिवे, राजेश बाठीया आदिंनी या पदयात्रेत सहभाग घेतला.
9 ऑगस्ट 1942 रोजी म.गांधींजींच्या ‘चले जाव – भारत छोडो’ आंदोलनात भाग घेऊन अहमदनगरच्या तत्कालीन सात स्वातंत्र्य सेनींनी सोसायटीच्या टॉवरवर झेंडा फडकावून ब्रिटीशांच्या कडक पोलिस बंदोबस्त असतांना हे धाडसी पाऊल उचलले होते. त्या स्मृतिप्रित्यर्थ सोसायटी हायस्कूल (फिरोदिया हायस्कूल) च्या टॉवरखाली स्मृतिफलक लावण्यात यावा, यासाठी आणि सरोष बॉम्ब स्फोट घटनेच्या ठिकाणी असाच स्मृतिफलक लावण्यात यावा, यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे यावेळी श्री. भुजबळ यांनी सांगितले.
प्रारंभी स्वागत, प्रास्तविक उबेद शेख यांनी केले तर शेवटी आभार शामराव वाघस्कर यांनी मानले.
संकलन : राजेश सटाणकर