कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

लोकसहभागाची जोड मिळाल्यास चांगले कार्य उभे राहते -पोपटराव पवार

    
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
मुलांना लहानपणापासून संस्कार मिळाले तर भविष्यात ते चांगले नागरिक बनतात. अंगणवाडी हे  संस्काराचे केंद्र आहे. मुलांमध्ये शाळेविषयी गोडी लावण्यासाठी अंगणवाडीचा चांगला उपयोग होत असतो. केंद्र व  राज्य शासनाच्यावतीने लहान मुलांच्या आरोग्य, शिक्षणाबाबत जागृत असून, त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोप्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास एक चांगले कार्य उभे राहते, हे या अंगणवाडीमधून दिसून येते. परिसरातील मुलांच्या भविष्याचा विचार करुन आधुनिक स्वरुपातील या इमारतीच्या माध्यमातून एक चांगली पिढी घडेल, असा विश्वास आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आ.संग्राम जगताप व प्रभागाच्या विकासासाठी नगरसेवक शाम नळकांडे यांचे सुरु असलेले कार्य आदर्शवत असेच आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

     कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे बालाजी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर व तिरुपती बालाजी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, पो.नि.अनिल कटके, शाम नळकांडे, राम नळकांडे, अनिल बोरुडे, मीना चोपडा, अनिल शिंदे, दिलीप सातपुते, गणेश कवडे, सचिन शिंदे, संजय चोपडा, प्रशांत गायकवाड, खासेराव शितोळे, भगवान काटे, उत्तमराव राजळे, पारुनाथ ढोकळे, अंकुश साबळे, संजय शेळके, अमोल बनकर, गणेश शिंदे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले,  शहर विकासात मुलभुत सुविधांबरोबरच इतर अनेक घटकांचा सहभाग असतो. शहराचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. केंद्र व राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून शहराच्या विकासास चालना देत आहोत. लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांना आपआपल्या भागात चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यादृष्टीने कामे सुरु आहेत. मनपा व नगरसेवकांच्या सहकार्याने प्रत्येक भागात चांगली कामे उभी राहत आहेत, याचे समाधान वाटते. या अंगणवाडी इमारतीच्या माध्यमातून परिसरातील बालकांना शिक्षण व आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

     यावेळी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले, प्रभागातील नागरिकांना चांगल्या मुलभुत सुविधा मिळाव्यात, त्यांच्या अडचणी दुर व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अंगणवाडीच्या माध्यमातून महिला व बालकांच्या आरोग्य व शिक्षणाची चांगली सोय होत असल्याने ही इमारत सुस्थितीत व आधुनिक असावी, यासाठी लोकांच्या पुढाकारातून निर्माण केली आहे. यापुढेही असेच नागरिकांना सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रयत्नशिल राहू, असे सांगितले.

     कार्यक्रमाच्या प्रास्तविकात अंकुश साबळे या अंगणवाडी इमारतीच्या निर्माण कार्याविषयी माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार राम नळकांडे यांनी मानले. यावेळी आघाव गुरुजी, सुशांत शिंदे, सुरेश आधारे, अमोल बागल, प्रकाश कोटा, ऋषी सामल, रामा गुंडू, मिलिंद गुंजाळ, प्रविण लोखंडे, सागर कोडम, गणेश कोडम, अतुल भोसले, सतीश नळकांडे, संतोष शियाळ, सागर गुंजाळ, सुबोध कुलकर्णी, रवी बागडे, जालू तापकिरे, मच्छिंद्र चौकटे, गणेश लयचेट्टी, राजकुमार कटारिया आदि उपस्थित होते.

     कार्यक्रमास अंगणवाडीतील बालक विविध प्रक़ारची वेशभुषा परिधान करुन पालकांसह उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शंभुराजे प्रतिष्ठान, शिवाजीनगरचा राजा मित्र मंडळ, नवग्रह प्रतिष्ठान, शाम नळकांडे मित्र मंडळ व परिसरातील नागरिकांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!