कर्जत पोलीस ठाणे व दादा पाटील काॅलेजतर्फे महिला सशक्तिकरण कार्यक्रम


विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत : जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कर्जत –
कर्जत पोलीस ठाणे व दादा पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयामध्ये महिला सशक्तिकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने नुकताच पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीगोंदा न्यायालयचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये पूर्वीचे आणि आत्ताचे स्त्रियांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे झालेले आहे. चूल आणि मूल एवढे स्त्रियांचे कार्यक्षेत्र राहिलेले नाही. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहे. शिक्षणामुळे स्त्रियांना मानाचे स्थान मिळालेले आहे. सध्याच्या काळात घरासोबतच शाळा महाविद्यालय हे संस्कार केंद्र बनलेले आहे. प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली ध्येय ठरवा, अडचणींवर मात करून घेण्यासाठी सतत प्रयत्न करा. आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करा. एकाग्रतेचा वापर शिक्षणासाठी करा आणि जीवन जगत असताना मनामध्ये अहंकार न बाळगता आत्मविश्वास बाळगा, असे सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठीच करा आणि प्राचीन काळी महिलांना असलेले स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, असं त्यांनी म्हटले.
या कार्यक्रमांमध्ये डॉ. माधुरी गुळवे यांनीही महिला सशक्तिकरण करण्यासंदर्भात कॉलेजची भूमिका स्पष्ट केली. कामामध्ये कॉलेजच्या चार विद्यार्थिनींनी मुलींना कोणत्या प्रकारे त्रास होतो याबाबत तसेच कर्जत पोलिसांचे वेळोवेळी मदत व मार्गदर्शन तत्काळ मिळत असते याबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोनि चंद्रशेखर यादव यांनी कर्जत पोलीस मुली आणि महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळोवेळी शाळा कॉलेजला भेटी देतात. अगदी मुलींची पोलीस स्टेशनला सहल सुद्धा काढली होती आणि कर्जत तालुक्यात सध्या मुलींना व महिलांना स्वतःच्या घरानंतर पोलीस ठाणे हे हक्काच घर वाटावं यासाठी काम करत असून त्यामध्ये चांगल्या प्रमाणात नक्कीच यश आल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच ते म्हणाले वेळोवेळी शाळा कॉलेजला भेटी देऊन मुलींना बोलत केल्याने आणि त्यांना विश्वास दिल्याने खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्या तक्रारींचं कर्जत पोलिसांनी निरसन केलं आणि यापुढेही कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास कोणी त्रास देत असल्यास थेट कर्ज पोलीस स्टेशनला अथवा स्वतःच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी डी एम गिरी, एम जे शेख, आर व्ही थाईल प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कर्जत न्यायालय हेही उपस्थित होते.
दादा पाटील महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सीनियर विभागातील व ज्युनिअर विभागातील सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमावेळी कर्जत बार असोसिएशनचे वतीने श्री शेख व इतर न्यायाधीश यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले. आभार उपप्रचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!