संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा करुणा शर्मा- मुंडे या पक्षबांधणी संदर्भ पाथर्डी दौ-यावर आल्या असता, त्यांनी भगवानगडावर जाऊन श्री संत भगवानबाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
भगवानगडांवर करुणा मुंडे या पहिल्यांदाच आल्या होत्या. आयुष्यातील हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा क्षण असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.दरम्यान बीड जिल्ह्यातील पक्षाची पहिली शाखा सावरगाव (ता.गेवराई) याठिकाणी त्यांच्या उपस्थित स्थापन करण्यात आली.यावेळी त्यांच्या सोबत शिवशक्ती सेना पक्षाचे युवक प्रदेशध्यक्ष बाबुराव बडे, जालिंदर जाधवर, राजेंद्र जाधवर, पवार मामा, सहदेव जाधवर, केकाण, रमेश गिर्हे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
संकलन-पत्रकार सोमराज बडे